Uncategorized

स्कुल बस अघातात पोलिस विभाग अपयशी != महिमाच्या मृत्यू प्रकरणात दोषी संस्था चालकास अटक करण्यास टाळाटाळ =

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

र्‍ आज पून्हा गावकर्यांचा रास्ता रोको =


उमरखेड :दुदैवी मृत्यू पावलेल्या स्कुल बस अपघातात ‘महिला ‘ ला न्याय मिळावा यासाठी ठिय्या आंदोलन – रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मात्र अद्यापही दोषी असलेल्या संस्था चालकास पोलिस विभाग पकडण्यात अपयशी ठरला असून पुन्हा एकदा उद्या दिनांक ५ फेब्रुवारी रोजी पालकवर्गाकडून पळशी फाटा येथे सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .

25 जानेवारी रोजी झालेल्या स्कूलबस दुर्घटनेमध्ये महिमा अप्पाराव सरकाटे या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला व 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले . यावर पोलिसांनी बस चालक प्रकाश घाडगे संस्थाचालक दर्शन अग्रवाल व मुख्याध्यापकावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला या चालकाला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी भेटली तर संस्थाचालक दर्शन अग्रवाल यांना अजूनही अटक केली नाही .सदर स्कूल बस आरटीओच्या अहवालानुसार कोणतेही कागदपत्र नव्हते व गाडी मालकाचा सुद्धा पुरावा नसल्यामुळे या अपघातास संस्थाचालक दर्शन अग्रवाल कारणीभूत असल्यामुळे त्यांना अटक करावी अशी पालकांची व मृत्यू पावलेल्या महिमाच्या नातेवाईकांची मागणी होती यासाठी शाळेसमोर ठिय्या आंदोलन विविध संघटनांनी निवेदने व पालक व दिवस पिंपरी येथील नागरिकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनात पोलिसाच्या निष्क्रियतीमुळे दर्शन अग्रवाल यांना अटक केली नसल्यामुळे त्यांना अटक करावी या मागणीची निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिवट पिंपरी येथील पालकांनी गावकऱ्यांनी व महिलांनी आज दिले आहेत . ४ फेब्रुवारी रात्री दुपार बारा वाजेपर्यंत दर्शन अग्रवाल यास अटक न केल्यास बुधवारी सकाळी 11 वाजता पुन्हा पळशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला आहे .
या केसच्या संदर्भात आज संस्था चालक दर्शन अग्रवाल यांनी बेल साठी पुसद न्यायालयात धाव घेतली होती परंतु आज आक्षेप आल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली त्यांनी वेळेवर त्यांचा से बदलू न आणला न्यायालयाने त्यांच्या बेलवर ७ फेब्रुवारीला सुनावणी ठेवण्यात आली आहे हे विशेष .

चौकट :
या अपघात प्रकरणात संस्था चालकास अटक करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा संशय असून पोलिस दबावाखाली तर नाही ना? असा संशयही पालकवर्गांनी व्यक्त केला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!