सामाजिक

बाळदी येथे मतदार नाव नोंदणी कॅम्प राबवा

(प्रहार जनशक्ती पक्ष,बाळदि शाखा यांच्या वतीने )

(निवडणुक अधिकारी विभाग, तहसिल कार्यालय,उमरखेड यांना निवेदन सादर)

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 20 नोव्हेंबर) भारत निवडणुक आयोगाने ग्राम पंचायत बाळदी येथे कॅम्पचे आयोजन करण्यात यावे.

मतदार पुनरपरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नाव नोंदणी, दुरूस्ती, वगळणे व आधार जोडणीसाठी राज्यातील सर्व ग्राम पंचायत मध्ये भारत निवडणुक आयोग मार्फत मतदार यादीची पडताळणी व दुरूस्ती करून ती त्रुटी विरहीत नविन करणे.

नविन मतदार नांव नोंदणी करून मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम बाळदी गावात राबविण्यात यावा.असा आदेश अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडुन करण्यात आला आहे.
तसा राज्यातील सर्व ग्राम पंचायत यांना तसेच निर्देश सुध्दा देण्यात आलेले आहेत.
आपण कॅम्प राबविण्यास ग्राम पंचायत बाळदी यांना तसा आदेश दयावा हि नम्र विनंती..!

यावेळी निवेदन देतांनी उपस्थित प्रवीण इंगळे (शाखा प्रमुख बाळदी नितीन राठोड, प्रफुल वानखेडे, अविनाश दुधे , विष्णू भोंग, विवेक जळके (प्रसिद्धी उमरखेड), गजानन शिणगारे व आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!