Uncategorized

एसटी बसला मिक्सर वाहनाची धडक

सुदैवाने जीवितहानी टळली : नांदगव्हाण घाटातील अपघाताची मालिका बंद होणार कधी?

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

घाटात रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांची मोठी रांग लागुन वाहतुक विस्कळीत होत आहे अशातच आज शनिवार (दि.४मे) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान याठिकाणी सिमेंट काँक्रिटच्या मिक्सर मशीनने बस ला धडक दिल्याने बस निर्माणाधिन असलेल्या पुलाच्या कठड्यावर जावून अडकल्याने बस दरीत कोसळण्यापासुन वाचल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महागाव तालुक्यातील नांदगव्हाण घाटात नागपुर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने यामुळे वाहतूक विस्कळीत होवुन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत आहेत तर या कामामुळे वाहनाचे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले असुन काहींना कायमचे अपंगत्व आले तर काहींना आपला जीव सुध्दा गमवावा लागला आहे. असाच प्रकार आज शनिवार (दि.४मे) रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान हदगाव आगाराची बस क्र.
एम एच २० बीएल २६०७ नदिड वरून
नागपुर जात असताना आज नांदगव्हाण


घाटात आल्यानंतर अगोदरच वाहतूक विस्कळित असल्याने सदर बसचा चालक या विस्कळीत वाहतुकीमधुन
मार्गक्रमण करीत असतांनाच याठिकाणी कामावर असलेल्या सिमेंट काँक्रिट मिक्सिंग करणाऱ्या वाहनाने
बसला मागुन जोरदार धडक दिली ही
घडक इतकी जोराची होती की बस पुढे समोर ढकलल्या जावून काही अंतरावर असलेल्या निर्माणाधिन
पुलाच्या कठड्यावर जावून आदळून अडकल्याने बाजूला असलेल्या खोल
दरीत कोसळण्याचा प्रकार रोखला गेला अपघात घडताच वाहनधारकांनी
धाव घेत बस मधील चालक, वाहक व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.

        चौकट 

कंत्राटदाराचा हलगर्जीपणा : काम
कासवगतीने
कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम कासव गतीने
सुरू आहे त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होवुन अपघात घडणे
नित्याचेच झाले असल्याने वाहनधारकांना जीवावर उदार होवुन याठिकाणावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे
लक्ष देवून कंत्राटदाराला रस्त्याचे काम तत्काळ पुर्ण करण्याचे आदेश देवुन वाहनधारकांची मरणाच्या दाढेतून सुटका करावी अशी मागणी वाहनधारक करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!