शहर

अब्दुल सोहेल यांची तत्परता आणि शिंदे साहेबांची कर्तव्यनिष्ठा: मध्यरात्री वॉर्ड ५ आणि १५ मधील वीज संकट टळले


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
शहरातील वॉर्ड क्रमांक ५ आणि १५ मध्ये काल रात्री ११:३० च्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. भीषण उकाडा आणि अंधारामुळे नागरिक हवालदिल झाले असतानाच, युवा सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सोहेल (सुपर कृषी सेवा केंद्र) यांनी तत्परता दाखवत मदतीचा हात पुढे केला.
​एका फोनवर शिंदे साहेब हाजर:
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सोहेल यांनी रात्रीच वीज विभागाचे कर्मचारी शिंदे साहेब यांना फोन लावला. विशेष म्हणजे, शिंदे साहेब हे स्वतः लाईनमन असून, सोहेल यांचा फोन येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळी हजेरी लावली. केवळ कामाचे आदेश न देता, शिंदे साहेब स्वतः जातीने हजर झाले आणि त्यांनी डीपी (DP) वरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या या सक्रियतेमुळे आणि सोहेल यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने दुरुस्ती होऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
​नागरिकांकडून कौतुक:
अंधार दूर झाल्याने वॉर्डातील अबालवृद्धांनी सुटकेचा निश्वास टाकला. संकटाच्या वेळी स्वतःहून धावून आलेले अब्दुल सोहेल आणि कर्तव्यदक्ष लाईनमन शिंदे साहेब यांच्या या कामाचे नागरिकांनी मनापासून आभार मानले असून, “शुक्रिया सोहेल भाई” आणि शिंदे साहेबांच्या तत्परतेचा गौरव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button