Uncategorized

उटी येथील १४ लाखांच्या घरफोडीचा तपास थंडबस्त्यात; आरोपी अजूनही मोकाट


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उटी येथे झालेल्या १४ लाख रुपयांच्या धाडसी घरफोडीचा अद्याप छडा लागलेला नाही. त्याचप्रमाणे फुलसांगवी येथील व्यापाऱ्याच्या घरातील घरफोडी प्रकरणाचाही सुगावा पोलिसांना लागलेला नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उटी येथील घरफोडीची घटना घडून आठवडा उलटूनही आरोपींचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराचा दरवाजा तोडून प्रवेश करत घरातील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे १४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी अनिकेत राजीव गावंडे यांनी महागाव पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तसेच तांत्रिक तपास, लोकेशन व संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
मात्र अनेक दिवस उलटूनही तपासात कोणतीही ठोस प्रगती दिसून आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याची चर्चा आहे.
गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी व परिसरात वाढती चोरीची मालिका रोखावी, अशी मागणी केली आहे।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button