मानवी मनाचे विश्लेषण करणारे बुद्ध भदन्त ज्ञानज्योती महाथेरो

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड . संपूर्ण विश्वामध्ये पहिल्यांदा मानवी मनाच्या प्रवृत्तीचे संशोधन जर कोणी प्रथम कोणी केलं असेल तर ते तथागत बुद्धाने म्हणूनच त्यांना विश्वातले पहिले मानवी मनाचे संशोधक म्हणतात असे प्रतिपादन ताडोबा अभयारण्य मध्ये राहणारे धुतांगधारी भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी केले . ते भारतीय बौद्ध ज्ञानालंकर शिक्षण संस्था मुळाव्याच्या वतीने १२ व १३ फेब्रुवारीच्या आयोजित विसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये ” मानवी मनाची अवस्था ” या विषयावर धम्मदेशना देताना बोलत होते . या

धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदन्त धम्मसेवक महास्थवीर हे होते तर यावेळी भदंत डॉ . सत्यपाल महाथेरो यांनी संपादित केलेले ‘बुद्ध संदेश’ या मासिकाचे प्रकाशन मान्यवर भिक्षूंच्या उपस्थितीत करण्यात आले . यावेळी भदंत डॉ .खेमधम्मो महाथेरो , भदंत दयानंद महाथेरो, भंते अश्वजीत ‘भदंत धम्मदीप अध्यक्ष भीम जन्मभूमी महू ,भदंत धम्मज्योती थेरो , भदंत महावीर , भदंत धम्मानंद थेरो , त्रिपीटीकाचार्य भदंत हंडापानमल पानगला (श्रीलंका ) यांच्यासह देश विदेशातील भिक्षू संघ उपस्थित होते . पुढे बोलताना भदंत ज्ञानज्योती महाथेरो म्हणाले , माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे यासाठी बुद्धाने धम्म दिला आहे . कार्ल मार्क्स लेनिन यांच्यासारख्या अनेक जागतिक विचारवंताना मानवी मनाचा ठाव घेता आला नाही . प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावानुसार वागत असतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणे अत्यंत अवघड अशी असणारी ही बाब पाहता बुद्धाने चिंतन , मनन , ध्यान करून या मानवी मनाचे विश्लेषण करून माणसाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे कसे न्याव यासंदर्भात सविस्तर विश्लेषण केले . त्यामुळे आजही बुद्धाचे विचार हे सर्वव्यापी असल्याचे त्यांनी म्हटले . या धम्म

परिषदेचे सूत्रसंचालन भदंत सत्यपाल महाथेरो यांनी केले तर भदंत ज्ञानज्योती महातेरो यांच्या जीवन कार्याचा परिचय डॉ भदन्त खेमधम्मो महाथेरो यांनी करून दिला या धम्म परिषदेला हजारोच्या संख्येने स्त्री-पुरुष सह अबाल वृद्ध उपस्थित होते . त्या सर्वांनी उपस्थीत भिक्षू व्दारे विविध बुद्ध वचनांचा . प्रवर्चना चा लाभ घेतला ( सोबत फोटो भदंत ज्ञानरक्षित महाथेरो धम्मदेश ना देताना )