१० घरफोडी व ०१ चोरीचा गुन्हा असे एकुण ११ गुन्हे उघडकीस आणुन ३४५.१ मि.ग्राम सोन्याचे दागिने व २०० मि.ग्राम चांदीच्या वस्तु केल्या हस्तगत.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
- स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई. मागील काही दिवसांत यवतमाळ शहरात घरफोडीचे घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यातच दिनांक ०६/०२/२०२५ रोजी यवतमाळ येथील एस.बी.आय चौक परिसरात असलेल्या अपर्णा अपार्टमेंट मध्ये दिवसा ढवळया घरफोडीचा प्रकार झाला होता त्याच प्रमाणे पोलीस ठाणे वणी व शिरपुर येथे सुध्दा घरफोडीच्या घटना झाल्या होत्या तसेच दिनांक १८/०१/२०२५ रोजी दिग्रस येथील रोडा ज्वेलर्स या सराफा दुकानातुन अनोळखी महिलांनी हातचलाखीने सोन्याचा रानी हार चोरी केल्याची घटना झाली होती. जिल्हयात अशा चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणने करीता आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी अधिनस्त पथकांना गुन्हेगारांचा मागोवा घेवुन गुन्हे उघडकीस आणन्याच्या सुचना दिल्या होत्या त्यावरुन स्था.गु.शा. कडील पथकांनी खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

(९) दिनांक १३/०२/२०२५ रोजी सपोनि संतोष मनवर व
त्यांचे पथकाने प्राप्त गोपणीय माहितीचे आधारे संशईत आरोपी रोशन उर्फ चिकन्या मोतीराम क्षिरसारगर रा. चिमुर जि. चंद्रपुर ह.मु. विश्वशांती नगर, यवतमाळ यास आणि रोड एम.एस.ई.बी. कार्या. परिसरातून ताब्यात घेवुन आरोपीकडे कौशल्यपुर्वक तपास करुन पो.स्टे. यवतमाळ शहर येथील ०३, पो.स्टे. अवधुतवाडी येथील ०२ व पो.स्टे. लोहारा येथील ०२ असे घरफोडीचे एकुण ०७ गुन्हे उघडकीस आणुन ११५.९८० मि.ग्राम सोन्याचे दागिने तत्कालीन किमंत २,९९,८५१/- रुपयाचे हस्तगत केले असुन आरापीस पुढील तपास कामी पो. ठाणे अवधुतवाडी यांचे ताब्यात दिले आहे.
(२) दिनांक १३/०२/२०२५ रोजी पोउपनि धनराज हाके व त्यांचे पथकाने प्राप्त गोपणीय माहितीचे आधारे संशईत आरोपी १) पंकज राजु गोंडाने वय २८ वर्ष रा. चवरे नगर सूत गिरनी रोड अमरावती जि अमरावती व आरोपी क्र २) सागर जनार्धन गोगटे वय ३४ वर्ष रा. गांधी चौक तुळजागीरवाला अमरावती जि अमरावती ह.मु. यादगार नगर कारंजा, जि वाशिम यांना अमरावती येथुन ताब्यात घेवुन आरोपीकंडे केलेल्या तपासात त्याने पो.स्टे. वणी व शिरपुर येथील घरफोडीच्या गुन्हयांची कबुली दिल्याने त्यांचेकडुन ११९.१२० मि.ग्राम सोन्याचे दागिने किमंत १०,३६,०००/- रुपये व ०३ मोवाईल किंमत २१,०००/- रुपये असा एकुण १०,५७,३४४/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन घरफोडीचे ०२ गुन्हे उघडकीस आणुन आरापीस पुढील तपास कामो पो. ठाणे वणी यांचे ताब्यात दिले आहे.
(३) दिनांक १३/०२/२०२५ रोजी सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे व त्यांचे पथकाने सी.सी.टी.व्ही फुटेज, गोपनिय माहिती व तांत्रीक विश्लेशनाचे आधारे संशईत महिला आरोपी १) सौ. नंदा मच्छींद्र डुकले, वय २२ वर्ष, रा खवळवाडी पाचोड ता पैठण जि छत्रपती
संभाजीनगर, आरोपी २) रोहीत मच्छींद्र डुकले, वय २२ वर्ष, रा. खवळवाडी पाचोड ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांना ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर येवून ताब्यात घेउन त्यांचेकडे तपास केला असता त्यांचे साथीदार आरोपी क्र ३) सौ. शितल अजय पवार, वय २७ वर्ष, रा. गेवराई जिल्हा बीड व ४) एक विधीसंघर्षग्रस्त बालीका यांचेसह पो.स्टे. दिग्रस येथील रोडा ज्वेलर्स या सराफा दुकानातुन सोण्याचा रानीहार चोरी केल्याची कबुली दिली असुन आरोपी रोहीत डुकले यांचेकडुन ६० मि.ग्राम तत्कालीन किमंत ४,३०,०००/- रुपयाचा रानीहार हस्तगत करण्यात आला आहे.
(४) दिनांक १३/०२/२०२५ रोजी पोउपनि गजानन राजमल्लु व त्यांचे पथकाने प्राप्त गोपणीय व तांत्रीक माहितीचे आधारे संशईत आरोपी रशिद शहा ऊर्फ तलवार सिंग हमीद शहा वय ४९ वर्ष रा.अकोला ता जि अकोला यास अकोला येथुन ताब्यात घेवुन आरोपीकंडे केलेल्या तपासात त्याने पो.स्टे. यवतमाळ शहर येथील अपर्णा अपार्टमेंट मधील फ्लॅट मध्ये दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन ५० मि.ग्राम सोन्याचे दागिने तत्कालीन किंमत ५०,०००/- रुपये व २०० मि.ग्राम चांदीच्या वस्तु किंमत १०,०००/- रुपये असा एकुण ६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन आरापीस पुढील तपास कामी पो. ठाणे यवतमाळ शहर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. सतिश चवरे पो.नि. स्थागुशा, यांचे मार्गदर्शनात, सपोनि संतोष मनवर, सपोनि गजानन गजभारे, पोउपनि धनराज हाके, गजानन राजमल्लु, शरद लोहकरे, पोलीस अंमलदार, योगेश गटलेवार, सैयद साजीद, बंडू डांगे, अजय डोळे, प्रशांत हेडाठ, रितुराज मेढवे, निलेश राठोड, विनोद राठोड, आकाश सहारे, रुपेश पाली, योगेश डगवार, आकाश सुर्यवंशी, देवेंद्र होले, योगेश टेकाम. सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, उल्हास कुरकुटे, निलेश निमकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी, नरेश राउत सतिश फुके, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, सुनिल पंडागळे, कविश पाळेकर, व दिगांबर पिलाचन सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.