Uncategorized

एकाच घरातील दोन सख्खे भाऊ देशसेवेसाठी झाले सज्ज.

.

उमरखेड प्रतिनिधी: –

उमरखेड शहराजवळच लागून असलेले एक छोटेसे खेडेगाव जेमतेम ५०० लोकांची वस्ती असलेले दहागाव या गावातील दोन भावांच्या धडपडीने आणि कष्टाने त्यांच्या कुटुंबाचा गौरव वाढवला आहे.
एका घरात जन्मलेले दोन भाऊ, एक भारतीय सैन्यात केंद्रीय राखीव पोलीस दल तर दुसऱ्याची मुंबई जिल्हा पोलिस व मुंबई कारागृह पोलिस या दोन्ही पदी निवड झाली आहे..
कुटुंबाची हलाखीची परिस्थिती होती ४ भावंड एक बहीण आई वडील असा परिवार बहिणीच लग्नं झाल आणि तिथून सुरू झाली ती एक वेळेस च्या जेवणाची सोय लावण्यासाठीची कामे लोकांच्या शेतात काम करून, मिस्त्री च्या हाताखाली काम करून, बाहेर गावी लातूर छोटे मोठे कारागिरी करून पैसे गोळा केले या काळात शिक्षण कसे बसे पूर्ण केले शिक्षण पूर्ण करण्यात अडचण आली नाही कारण वडील उच्च शिक्षित होते परंतु त्यांच्या काळी त्यांना याच आर्थिक परिस्थिती मुळे कुठे बाहेर शहराच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी जाता आले नाही..
“मी नोकरी करू शकलो नाही म्हणून काय झाले, माझे मुल मी उच्च पदावर नेल्याशिवाय राहणार नाही अशी जिद्द ठेऊनच आम्हाला कष्ट करून स्वाभिमानी जीवन कस जगायचं आणि परिस्थिती वर मात करून लढायच कसं हे शिकवलं..”

सर्वात लहान भाऊ अतुल धुळे जो सध्या जम्मू काश्मीर येथे कार्यरत आहे, आपल्या कर्तव्यात उत्कृष्टता प्राप्त करतोय. त्याच्या निष्ठेने आणि समर्पणाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. दुसरा भाऊ, प्रसिक धुळे पोलिस म्हणून लागला या दोघांनी देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे तर तिसरा भाऊ अत्तदिप धुळे हा राज्यसेवा पूर्ण परीक्षेची तयारी करत आहे..
या अशा भावांच्या जिद्द आणि समर्पणामुळे, त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या कर्मभूमीला सलाम केला आहे. एकमेकांमध्ये प्रगतीच्या स्पर्धेतून आपली भूमिका निभावत आहेत, आणि त्यांच्या यशामुळे स्थानिक समाजाने त्यांना मोठे आदर्श मानले आहे.

“दोन भाऊ, दोन वेगळ्या विभागात कार्यरत असताना, एकाच घरात त्यांच्या कुटुंबाने असलेली प्रेरणा आणि प्रेरक जीवनाची कथा, नक्कीच अनेकांना प्रेरणा देईल,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आहे.

गावातील नागरिकांसाठी हे एक उत्तम प्रेरणादायी प्रसंग असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!