महिमा ‘ या चिमुरडीस न्याय मिळावा यासाठी शिवसेनेचा पुढाकार ! याचीका दाखल करण्यासाठी नागरीकांकडून प्रतिसाद !

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड स्कुल बस अपघातात मृत्यू पावलेल्या ‘ महिमा ‘ हिला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा यासाठी शिवसेनेने ( शिंदे गट ) उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.यासाठी आज कार्यकर्त्यानी शहरात फिरुन ‘ एक हात मदतीचा एक रुपया ‘ हि संकल्पना राबविली.याला शहरवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला .
दहागाव येथील स्टुडन्टस वेल्फेअर इंग्लीश मेडियम स्कुलच्या बेजबाबदार प्रशासनाच्या विरोधात हि जनहित याचिका दाखल करण्यात येणार असून महिमाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कडक कार्यवाही व या प्रकरणात आरोपी असलेल्या संस्था चालकास अटक करण्यास बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या पोलिस प्रशासना विरोधात न्यायालयात न्याय मागून महिमाला न्याय मिळावा यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे . त्यासाठी शहर शिवसेना पुढाकार घेऊन शहरातील व्यापारी तथा नागरीकां कडून एक हात मदतीचा म्हणून १ रुपया मागत आहे . सर्व स्तरातील नागरीकांचा या संकल्पनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.यावेळी शहर प्रमुख अँड. संजय जाधव, कैलास कदम, रवि रुडे, राजु गायकवाड, सपना चौधरी, दामोधर इंगोले, बसवेश्वर क्षीरसागर व मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या .