Uncategorized

स्वामी रामदेव बाबा इंग्लिश स्कूल , वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा उत्साहात साजरा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड शहरातील नावाजलेली स्वामी रामदेव बाबा इंग्लिश स्कूल शाळा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षा.सौ. प्राध्यापिका जयमाला लाडे मॅडम (पंचकृष्ण महाविद्यालय मुळावा) तर प्रमुख पाहुणे श्री. विद्वान केवटे (बहुजन मुक्ती मोर्चा महासचिव),माननीय.श्री. विठ्ठलराव कदम ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी मागासवर्गीय विकास संस्था ,पळशी ,अध्यक्ष) माननीय सौ.आदिती तास्के ( संचालिका, स्वामी रामदेव बाबा इंग्लिश मीडियम स्कूल उमरखेड ) मा. प्रा.श्री. शिरगिरे सर गो,सी गावंडे कॉलेज ( जेष्ठ शिक्षक) प्रा.श्री.शरद वारकड सर (संचालक ,S-ZONE एज्युकेशनल अकॅडमी ) , प्राध्यापिका सौ.उषा तास्के( ज्येष्ठ शिक्षिका) प्रा. श्री.रवी भोने सर (प्रिन्सिपल, एल के इंग्लिश मीडियम स्कूल महागाव ) प्रा. श्री.उमेश ठाकरे (प्रिन्सिपल,गोविंदराव आर्य इंग्लिश मीडियम स्कूल पोफाळी) सौ अपर्णा रेघाटे (प्रिन्सिपल स्वामी रामदेव बाबा इंग्लिश मीडियम स्कूल उमरखेड) अविनाश शिंदे, अश्विन फंदे, संजय पेंधे , राम पेंधे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सर्व
मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षिका सौ.सुनीता वानखेडे मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, कोळीगीत, लावणी, नाटक या कलेचा अविष्कार विद्यार्थ्यांनी नृत्यद्वारे दाखवण्यात आली. या कार्यक्रमाचे सांस्कृतिक प्रमुख सौ.शुभांगी कुबडे, कु.शितल बिजोरे , सौ.नीतू पातूरकर, सौ निकिता कदम, सौ.शितल सूर्यवंशी मॅडम या कार्यक्रमासाठी खूप मोठे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका अपर्णा रेघाटे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी पालकांचा खूप मोठा सहभाग होता पालकांनी विद्यार्थ्यांना टाळ्याच्या गजरात तसेच शब्दरूपी प्रोत्साहन दिले तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक माननीय गोविंदराव तास्के यांनी मोलाचे सहकार्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!