Uncategorized

प्रजासत्ताकदिना निमित्य महापुरुषाच्या प्रतिमेला टाळल्याबाबत मुख्याध्यापकास निलंबित करण्याची मागणी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


महागांव दी ३० प्रजासत्ताकदिनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमेचे पूजन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुख्याध्यापकावर सेवा शर्ती चा भंग केल्या प्रकरणी शिस्त भंगाची कारवाई करून निलंबित करन्याची मागणी संदेश रणवीर डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधिनी च्या वतीने शिक्षण मंत्री महाराष्ट्र,संचालक,पुणे, उपायुक्त अमरावती, शिक्षणाधिकारी यवतमाळ, गट शिक्षणाधिकारी, महागांव यांना केली आहे
सविस्तर असे की स्व.रामभाऊ कोसलगे माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय प्रजासत्ताक दिनी शासनाचे परिपत्रकाला डावलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नाही या बाबत पोखरी येथील नागरिकांनी ही बाब मुख्याध्यापकास लक्षात आणून दिली असता,ठेवत नाही म्हणून अरेरावी ची उद्धट भाषा वापरली हा प्रकार महापुरुषाच्या प्रेरणापासून विध्यार्थ्यांना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचे कारस्थान रचल्या प्रकरणी मुख्याध्यापका विरुद्ध चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी संदेश रणवीर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!