प्रियदर्शनी इंदिरा गांधी शिक्षण संस्था येथे खऱ्या जिजाऊ मनून आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या एस टी डेपो तील पदाधिकारी व कर्मचारी महिलांचा सत्कार करून जिजाऊ जन्मोत्सव उत्साहा त साजरा.

कर्तव्यावर कसोटीचे कार्य करणाऱ्या महिलाच आजच्या खऱ्या जिजाऊ सरोज देशमुख.
देशमुख महाविद्यालय
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
माध्यमिक विद्यालय उमरखेड येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती संस्थेच्या अध्यक्षा शिवमती सरोज देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यास आपल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी शिक्षण संस्थेच्या संचालिका शिवमती सरोज देशमुख मॅडम यांनी अध्यक्ष स्थान भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मॅडम उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड आगार मधील सर्व महिला वाहक व इतर महिला कर्मचारी उपस्थित होत्या . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रमोदिनी किनाके मॅडम यांचा व उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या अध्यक्षा सौ. देशमुख मॅडम यांच्या हस्ते kसत्कार करण्यात आला.राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेमध्ये विद्यालयातील विद्यार्थिनींनी भरभरून सहभाग घेतला,त्यांचा सत्कार उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमोदिणी कीनाके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि घरच्यांचे व शाळेचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन त्यांनी केले. संस्थेच्या अध्यक्षा सौ. देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये अंगीकृत करून उच्च ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे असे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे व गीते सादर केलीत.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग , कॉलेजचे प्राचार्य मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुसळे सर तर आभार प्रदर्शन अमोल सर यांनी केले.