Uncategorized

कासोळा बसस्टॉपजवळ ‘छोटा हत्ती’ला आग; सुदैवाने जीवितहानी टळली


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
–महागाव तालुक्यातील कासोळा बसस्टॉपजवळ आज दुपारी अशोक लेलँड कंपनीच्या ‘छोटा हत्ती’ मालवाहू वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. संबंधित वाहनामध्ये फटाक्यांची वाहतूक होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अतिउष्णतेमुळे वाहनाने अचानक पेट घेतल्याचे सांगितले जात असून काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प होऊन ट्राफिक जाम झाला होता. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता वाहनचालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना उन्हाळ्यात वाहन चालविताना व ज्वलनशील वस्तूंची वाहतूक करताना आवश्यक ती दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button