वैध रेती माफियांना आशीर्वाद महसूल व पोलीस प्रशासनाचा आशीर्वादाने ?

शेख इरफान मुख्य संपादक
पोफाळी :- पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध रेती जोरात चालू आहे पोफळी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध मोठ्या प्रमाणात व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे मुळावा हातला पळशी बारा पैनगंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू चोरी जोमात चालते, यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी महसूल नेमलेल्या पथक याच्यावर का लक्ष देत नाही चिंताचा विषय आहे कर्तव्यदक्ष अधिकारी गजानन सुरोशे वाळू माफिया सोबत पार्टनरशिप तर नाही अशी चर्चा चालू आहे तलाठ्यापासून उपविभागीय अधिकारी व महसूलचे, अधिकारी, खनिकर्म अधिकारी व पोलीस प्रशासन या सर्वांची असते. वाळूची अवैध वाहतूक, होत असताना यात आपल्या कर्तव्यात कोण कसूर करत आहे.
हे तपासले जाणार आहे का? वाळू उपशावर बंदी असूनही मुळावा हातला बारा पळशी पैनगंगा नदी पात्रातून खुल्ले आम अवैधरित्या वाळूउपसा आणि वाहतूक सुरू आहे. पोलीस प्रशासन व महसूल अधिकारी याचे आशीर्वादाने मुळावा पळशी बारा हातला या गावातून अवैध उपसा जोरात चालू आहे या गैरप्रकाराला आशीर्वाद कोणाचा ?



