न्यू जय मातादी दुर्गाउत्सव मंडळ तर्फे रक्तदान शिबीर

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- न्यू जय मातादी दुर्गाउत्सव मंडळ सिद्धेश्वर नगर बोरबन उमरखेड तर्फे व नवरात्र निमित्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
रक्तदान शिबिरामध्ये सिद्धेश्वर नगर बोरबन येथील 40 युवकांनी व 10 महिलांनी रक्तदान केले. यावेळी शिबीर यशस्वीरित्या पार पडला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गोपाल भाऊ अग्रवाल, प्रमुख पाहुणे उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांचाळ साहेब, गजूभाऊ ठाकरे, दत्ताभाऊ गंगासागर, डॉ. वानखेडे साहेब,
विजुभाऊ हरडपकर, दीपक कांबळे साहेब, संजय सोळंके गजानन पाचकोरे सर, न्यू जय मातादी दुर्गाउत्सव मंडळातर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे नियोजन जय मातादी दुर्गोत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले.
यावेळी राहुल कोळपे. दिनेश भाऊ जाधव, सतीश हंबीर, आशितोष बोंडगे, नाना खापरे, श्रीकांत कांबळे, सुनील खडककर,
अक्षय घोडे,रत्नदीप सांगडे, प्रशांत खांडरे, रोहित पुंडे,व सर्व सदस्य व महिला मंडळ उपस्थित होत्या
चौकट
रक्तदान शिबिरामध्ये महिलांचा खूप मोठा प्रतिसाद..