खोट्या फीर्यादी वरुण नोंदविण्यात आलेले गुन्हे खारीज करा !( उमेदच्या तालुका कक्ष व्यवस्थापक व प्रभाग समन्वयकाची पोफाळी ठाणेदाराकडे मागणी )

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड : पंचायत समीती उमरखेड अंतर्गत येत असलेल्या उमरखेड उमेद कार्यालयाचे व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक मुळावा यांच्या विरोधात पोलीस स्टेशन पोफाळी येथे मागील काही दिवसा पुर्वी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु तक्रार अर्जात नमुद केलेल्या बाबी धादांत खोट्या असुण या संबंधाने दाखल करण्यात आलेला आमच्या वरील गुन्हा खारीज करण्यात यावा अशी मागणी पोलीस निरीक्षक पोफाळी यांच्याकडे उमेद कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनातुन केली आहे .

पंचायत समीती उमरखेड अंतर्गत उमेद कार्यालयात कक्ष व्यवस्थापक म्हणुन कंत्राटी पदावर नौकरी करीत असलेले रामदास इटकरे व मुळावा प्रभाग समन्वयक माधुरी दळवी यांच्या विरोधात पोलीस स्टेशन पोफाळी येथे फीर्यादी पार्वती तानाजी भीसे याणी फिर्याद दाखल केली होती सदर फीर्यादीने दिलेली तक्रार ही चुकीची व खोटी असुन फीर्यादीने तक्रारीत दिलेल्या तारखेला व त्याचे चार दिवस आलीकडे आम्ही मुळावा गावात गेलेलो नसताना फिर्यादीने मुळावा येथील उमंग कार्यालया समोर दिनांक 18 सप्टेबर रोजी आम्ही फिर्यादी सोबत शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे परंतु फिर्यादीत नमुद तारखेला आम्ही व आमचे इतर कर्मचारी दिवसभर पंचायत समीती उमरखेड येथे जमलो होतो व त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी यवतमाळ येथे वेबिनार असल्याने गेलो होतो या बाबतीतले उपस्थितीपत्र देखील उमेद च्या दोन्ही कर्मचार्यानी पोलीस निरीक्षक पोफाळी याना दिलेल्या निवेदना सोबत जोडले असुण या प्रकरणातील फीर्यादी पार्वती तानाजी भीसे ही महिला उमेदची आय सी आर पी असुण सदर महीलेच्या बचत गटाला मानव मीशन अंतर्गत बकरी पालन करण्यासाठी बकऱ्या मंजुर झाल्या होत्या मंजुराती प्रमाणे संबंधीत बचत गटाला नीयमानुसार बकऱ्या सुध्धा मीळाल्या परंतु बकरयांच्या चारा कटाई साठी ५०,००० रुपये किमतीचे मीळणारे कटर खरेदी न करता फिर्यादी महिला व तीचा पती हे दोघेही जन वारंवार आम्हाला जुने कटर दाखवून पैस्याची मागणी करीत होते संबंधीत महिला व तीचे पतीची मागणी पूर्ण होत नसल्याने वैफल्यातुन त्याणी आमचेवर खोटी तक्रार दिल्याचे निवेदनात म्हटले असुण अशा प्रकारची खोटी तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे ती तक्रारच खारीज करण्याची मागणी उमेद व्यवस्थापक रामदास इटकरे व प्रभाग समन्वयक माधुरी दळवी याणी ठाणेदार पोफाळी यांच्याकडे दिलेल्या संयुक्त निवेदनातुन केली आहे.
॥ चौकट ॥ या बाबतीत तक्रार प्राप्त झाली असुण त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या बाबतीत अधीक चौकशी सुरु असुन सत्य व असत्य काय ? हि बाब पडताळनी व तांत्रीक तपासातुन निष्पन्न होणार आहे .
॥ ठाणेदार पंकज दाभाडे पो.स्टे. पोफाळी
