Uncategorized

पक्ष व जनतेने खूप काही दिले माजी आमदार विजय खडसे : मित्र मंडळाकडून सत्कार

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192

उमरखेड, ता. १० : काँग्रेस पक्षाने व जनतेचे माझ्यावर खूप उपकार आहे, त्या उपकाराची परतफेड मी कदापि करू शकणार नाही. माझ्यासारख्या सामान्य माणसावर वाढदिवसानिमित्त अभिनंदनचा वर्षाव आणि प्रेमरूपी सत्काराची बरसात झाली. जनतेचे हे माझ्यावर असलेले प्रेम पाहून मी धन्य झालो, असे विचार माजी आमदार विजय खडसे यांनी केले.

कृष्णा पाटील देवसरकर मित्र मंडळाच्या वतीने स्थानिक राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे माजी आमदार विजय खडसे यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके होते. यावेळी मंचावर प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सचिन नाईक, डॉ. मोहम्मद नदीम, तातू देशमुख, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, दत्तराव शिंदे, शिवाजी देशमुख, इनायतउल्ला जनाब, बालाजी उदावंत, नंदकिशोर अग्रवाल भीमराव चंद्रवंशी, स्वप्निल कनवाळे, कृष्णा पाटील देवसरकर, रामराव गायकवाड, महेंद्र कावळे, वनमला राठोड, सतीश नाईक, प्रतिभा खडसे, सुनंदा कोपरकर उपस्थित होते. प्रा. पुरके यावेळी म्हणाले, विजय खडसे हा पायदळ चालणारा माणूस आहे. अत्यंत सर्वसामान्य असा माणूस आहे, आमदार म्हणून तो कधीच मिरवला नाही. प्रास्ताविक माजी जि. प. अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी तर संचालन देवकांत वंजारे यांनी केले. आभार रामराम गायकवाड यांनी मानले.

उमरखेड :विजय खडसे यांच्या ६८ व्या माजी आमदार विजय खडसे यांचा सपत्नीक सत्कार करताना मित्रमंडळ व मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!