Uncategorized

पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या सह जमादार यांच्यावर कारवाई करून बडतर्फ करा ,


आजाद समाज पार्टीचे , जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड – पोफाळी पोलीस स्टेशन चे जमादार सह ठाणेदार यांना बडतर्फ करून तात्काळ कारवाई करन्यात यावी अशी मागणी दिनांक 29 ऑगस्ट रोजी आजाद समाज पार्टीचे पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले आहे
पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीस नाहक मारहान करणाऱ्या जमादार नाना मस्के यांच्यासह कर्मचाऱ्याचा बचाव करून आर्थिक संबंध ठेवून अवैध धंद्यांना पाठबळ देणारे पोफाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना बडतर्फ करून कारवाई करण्याची मागणी यावेळी आजाद समाज पार्टीचे पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून केली आहे
पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथील राघोजी माधव दारमोडे हे दिनांक 16 एप्रिल रोजी रिपोर्ट देण्यासाठी गेले असता त्यांना जमादार नाना मस्के यांनी नाहक मारहान करून कानाचा पडदा फाटला असल्याने घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये व फिर्यादी सोबत दोन साक्षीदार समक्ष हा प्रकार घडला असताना याची योग्य ती दखल न घेता ठाणेदार यांनी फिर्यादीचे खोटे बयान व खोटी सई मारून प्रकरण दडपऊन कर्मचारी नाना मस्के यांचा बचाव करण्यात आला असल्याने संबंधित घटनेची तात्काळ चौकशी करून जमादार नाना मस्के यांनी यापूर्वी अनेक फिर्यादीना नाहक मारहान केल्याचे प्रकार करून आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न केले आहेत, वादग्रस्त जमादार नाना मस्के यांचे अवैध व्यवसायिकासोबत घनिष्ठ संबंध असल्याने त्यांचे कॉल डिटेल तपासून संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असुन अन्यायग्रस्त फिर्यादीस तात्काळ न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे .
पोफाळी पोलीस स्टेशनचे संमधित ठाणेदार रुजू झाले तेव्हापासून पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यात वाढ होऊन गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याने धनज येथील ग्रामपंचायतने अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात ठराव पारित करून तक्रार सादर करून पोलीस स्टेशनला दिली असता तरी पण अवैध धंदे सुरूच असल्याने ठाणेदार हे आर्थिक संबंधातून अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असल्याने वरील सर्व प्रकाराची तात्काळ चौकशी करून पीडितांना न्याय देऊन फिर्यादीस नाहक मारहाण करणाऱ्या जमादार नाना मस्के सह ठाणेदार यांच्यावर कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आजाद समाज पार्टीच्या पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून दिला आहे यावेळी यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टि विनकरे , संतोष जोगदंड , देवानंद पाईकराव , सचिन वाहुळे , प्रफुल दिवेकर , गौतम कांबळे , विनोद बरडे, विष्णुकांत वाठकर, सुशांत धोंगडे, आशिष भवरे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!