उमरखेड आगाराने घेतली महिला सुरक्षेते ची जवाबदारी

(आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांनी वेळीच निर्णय घेतल्याने महिलांनी केले स्वागत)
सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दिनांक २८ ऑगस्ट) आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके ह्या वैयक्तिक कारणास्तव रजे वर होत्या.
मात्र रात्री २२.३० वाजता सुरक्षा रक्षक श्री गावंडे यांना फोन कॉल करून आगाराच्या परिसर व कामकाजा बाबत विचारणा केली असता, श्री गावंडे यांनी शिवपुराण कार्यक्रम वरून ढाणकी येथे जाणाऱ्या महिला बसस्थानकवर असल्याचे सांगितले असता आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांनी अधिंस्त कर्मचारी यांना फोनवर सूचना देवून वेळ न वाया घालवता स्वतः च वाहन परीक्षक म्हणून कामकाज करणारे चालक श्री गजानन नंदनवार व वाहक श्री एस कदम यांना सूचना देवून महिलांना त्यांच्या गावाला गाडी सोडायला सांगितली.
या दरम्यान गाडी व मशीन घ्यायला वेळ लागणार होता तसेच पाऊस सुरू होता तेव्हा आगार व्यवस्थापक यांनी सुरक्षा रक्षक यांना बसस्थानकवर महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसस्थानकवर थांबायला सांगितले.
आज ठीक ठिकाणी महीला असुरक्षित असल्याचे दिसून येते परंतु उमरखेड आगाराने राखीच्या पर्वावर महिलांना रात्री त्यांच्या गावी सुरक्षित सोडून माणुसकीचे दर्शन घडविले व रा प महामंडळ हे प्रवाशांच्याच सेवेसाठी आहे.
हे वाक्य खर करून महिलांना खऱ्या अर्थाने राखीची ओवाळणी दिली.
या बाबत महिलेने चालक वाहक यांचे आभार मानले.
कर्तव्यदक्ष आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांच्या पुढाकाराने या महिला सुखरूप आपल्या गावी पोहोचले याबद्दल किनाके मॅडम यांची सर्व स्तरावरून कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.