Uncategorized

विदेशी पर्यटकांनी सहस्त्रकुंड धबधब्याला लावली हजरी


शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192

महाराष्ट्रातील उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य क्षेत्रातील प्राचीन असा सहस्त्रकुंड धबधबा विदर्भ आणि मराठवाडा या सीमेवर असून पावसाळ्यामध्ये या भागातील या मनमोहक व निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना भुरळच पाडतो. पावसाळ्यामध्ये पर्यटकाची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. भारतातील वेगवेगळ्या भागातील पर्यटक हे दृश्य पाहण्यासाठी व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतात. याचीच चाहुल आता विदेशी पर्यटकांना देखील लागली आहे. विदेशी पर्यटकांना देखील या निसर्गरम्य वातावरणाचा मोह आवरता आला नाही. त्यांनी देखील या सहस्त्रकुंड धबधब्याला आपली हजेरी लावली यामध्ये स्पेन मेक्सिको

येथील महिला पर्यटकांनी या निसर्गरम्य वातावरणाचा दिलखुलास आनंद घेतला. हे भारतामध्ये न विसरणारे स्थळ असून या ठिकाणावरून जावेसे वाटत नाही. परत या ठिकाणी आम्ही भेट देऊ व या वातावरणाचा आनंद घेऊ विदेशी पर्यटकाच्या वाढत्या गर्दीमुळे या भागातील लोकांच्या व्यापारामध्ये आर्थिक भर पडणार आहे. आता या पर्यटन स्थळाची महाराष्ट्र सरकारने योग्य ती दखल घेऊन विदेशी पर्यटकांच्या गरजा लक्षात घेऊन या भागाचा विकास करावा असे येथील जनतेचे म्हणणे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!