सामाजिक

77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर आमरण उपोषणाला बसणार – शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष)

सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

यवतमाळ (दि. ५ ऑगस्ट) मी शाम माधव धुळे रा. उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील असून मी भिम टायगर सेनेचा सामाजिक संघटना एक पदाधिकारी असून मी अनुसूचित जातीपैकी महार जातीचा आहे. माझ्या समाजाचे अनेक विद्यार्थी उमरखेड येथे शिक्षण शिक्षणासाठी येत असतात त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी मला सांगितले की, आपले अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी हे मटका व जुगाराच्या नादी लागले आहेत त्यामुळे त्यांचे भविष्य उध्वस्त होत आहेत.

तसेच शहरातील अनेक महिलांनी सुद्धा माझ्याकडे तक्रार केली आहे की, आमचे नवरे दिवसभर काम करून रोज मजुरीचे आलेले पैसे जुगार व मटक्यात घालवीत आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. आशा तक्रारी आल्यामुळे मी उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना तक्रार दि.05/08/2022, दि.,13/08/2022, दि. 14/06/24, दि.05/09/2023, दि. 11/07/24 रोजी इत्यादी लेखी तक्रार अर्ज वारंवार दिल्या पण पोलीस निरीक्षक यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
उलट मटका व जुगार मोठ्या प्रमाणावर वाढविले.

पुन्हा सुद्धा समाजाचे अनेक विद्यार्थी / महिला यांनी माझ्याकडे तक्रार केल्या होत्या. तुम्हाला आम्ही सांगितले होते की, मटका व जुगार काय झाले, म्हणून मी परत सदर पोलीस निरीक्षक यांची ओळख जवळपास चार महिन्यांपासून असून आहे. त्यांनी पहिल्या भेटीतच माझी जात विचारली होती. त्यामुळे मी पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांना प्रत्यक्ष भेट घेऊन विचारले असता पोलीस निरीक्षक यांनी माझ्या विषयाला अनुसरून उत्तर देण्याऐवजी मादरचोदा लय माजला का?, लय मटक्याच्या आणि जुगाराच्या मागे लागला, मला माहित आहे तुझ्या जातीच्या लोकांना काही काम नाही.
खांद्यावर निळे रुमाल टाकून जाता हा तुमचा धंदा झाला. भविष्यात जर पोलीस स्टेशनला जुगार व मटका संबंधाने आला तर तुला एखाद्या खोट्या केस मध्ये अडकून टाकेलं.
चल निघ इथून अशा धमकी दिल्या.

मटका व जुगार चालविणारे लोक हे गुंड प्रवृत्तीचे असून हे पोलीस निरीक्षक यांच्या सांगण्यावरून माझ्या विरोधात तक्रार देण्यास भाग पाडू शकतता. हा पोलीस निरीक्षक अत्यंत भ्रष्टाचारी असून एकमेव पैसा गोळा करणे हा त्यांचा उद्देश आहे.

म्हणून पोलीस अधीक्षक साहेबांनी पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांचे ऑल कॉल रेकॉर्ड तपासावे. व पोलीस निरीक्षक यांचे पैसा वसुली करणारे रायटर यांचे सुद्धा ऑल कॉल रेकॉर्ड तपासले तर आपल्या लक्षात येईल की मटका व जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून मोठ्या प्रमाणावर अवैध धंदेवाल्यांकडून पैशाची वसुली होत आहे.

पोलीस निरीक्षक यांची खातीनिहाय चौकशी करावी, तात्काळ बदली करावी,
ॲट्रॉसिटी ॲक्ट व इतर नियमानुसार भारतीय न्याय सहित अन्वये गुन्हा दाखल करावा.
अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदना मार्फत केली आहे.

चौकत:- अन्यथा मी स्वतंत्र दिनाच्या पूर्व संध्येस एक दिवस अगोदर दि. 14 /08/2024 रोजी मा. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसेल.
माझ्या जीवितास बरे वाईट झाल्यास संबंधित पोलीस निरीक्षक संजय साळुंके हेच जबाबदार राहतील याची गंभीर नोंद घ्यावी. असा ही इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!