जागे अभावी मच्छी व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात भोई समाजाची मागणी
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मच्छीमार हे दैनंदिन मच्छी विक्रीसाठी करोडी रोड, उमरखेड येथील मच्छी मार्केट वर पूर्णता अवलंबून असुन, सदरील मार्केटमध्ये भोई समाज बांधव आपली मच्छी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु सध्याच्या मच्छी मार्केटमध्ये अपुऱ्या असलेल्या जागेमुळे त्यांना मच्छी विकणे सुद्धा शक्य होत नाही. अनेक वेळा त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटलेली असून उमरखेड तालुक्यातील भोई समाज बांधव बेरोजगारीच्या व कर्जबाजारीच्या विळख्यात सापडलेले आहेत.
आज रोजी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात उमरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या जवळ व्यथा मांडून सदर मच्छी मार्केट मधील जागा तात्काळ वाढवून देण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, ता. सरचिटणीस साहेबराव कदम, नंदू इटकरे, शहर सचिव साई पाटील नरवाडे तसेच माधव भोयर, सकाराम राकडे, काशिनाथ आगिरे, गजानन भोयर, देवराव राकडे, विजय राकडे, उमेश राकडे, नारायण राकडे, श्रीराम आगिरे, संजय कामरे, सुरेखाबाई कामरे, मुनेश्वर राकडे, रामदास राकडे, लक्ष्मण राकडे, माधव राकडे, देविदास राकडे, अंबादास राकडे, गणेश आगीरे, अंकुश आगीरे, मुकुंदा राकडे, रामदास आगिरे, गजानन राकडे, भाऊराव भोयर, शामराव आगिरे तसेच मोठ्या संख्येने तालुक्यातील भोई समाज बांधव उपस्थित होते.
चौकट :- भोई समाजातील मच्छी व्यावसायिकांची मार्केटमधील अपुऱ्या जागेची समस्या ही दिवसेंदिवस भीषण होत असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना गरजेचे आहे. अन्यथा आम्हास आंदोलन उभारावे लागेल. – सुनिल पाटील चिंचोलकर, जिल्हाध्यक्ष यवतमाळ