Uncategorized

सावत्र भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर वारंवार अतिप्रसंग

सिध्दार्थ दिवेकर (उमरखेड तालुका प्रतिनिधी)

पोफाळी (दि.८ जुलै) पुण्यात वडील, काका आणि चुलत भावांनी एक अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्याची घटना जी ताजीच असतांना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मोहदरी या गावी बहीण भावाच्या नात्याला कलंकित करणारी व संतापजनक घटना घडली असून, मोहदरी येथील आशिष कांबळे नामक सावत्र भावाने आपल्या पेक्षा खूप लहान असणाऱ्या १४ वर्षीय सावत्र बहिणी सोबत कोणीही घरी नसताना चा फायदा घेऊन अल्पवयीन बहिणीवर वारंवार बलात्कार करण्याची घटना घडल्यामुळे संपूर्ण उमरखेड तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीने या संदर्भात आपल्या आई च्या मैत्रिणीला सांगितल्यानंतर सदर घटना उघडकीस आली.
त्यानंतर त्या मैत्रिणीने सदर घटनेबद्दल पीडित मुलीच्या आई ला सांगितली.
सदर प्रकार हा सप्टेंबर २०१८ ते २०१९ पर्यंत सतत घडत होता आणि त्यावेळी पीडित मुलीचे वय हे फक्त १० वर्ष एवढे होते.
मुलीने सदर घटना आपल्या आईला किंवा इतर कोणाला सांगितल्यास आरोपीने पीडितांच्या मुलीला जीवाने मारून टाकतो अशी देत असल्याचे पीडित मुलीने सांगितले आहे.

सदर घटनेची तक्रार पीडित अल्पवयीन मुलगी आणि आई ने पोलीस स्टेशन पोफाळी येथे दिलेली असून सदर पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी आशिष कांबळे विरुद्ध अपराध क्र. १५९ /२०२४ नुसार भा. द.वी चे कलम ३७६ (३)३७६ (२)(n) आणि ३७६ (२) फ ५०६ व बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल झालेला असून पोलिस तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन चे पंकज दाभाडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!