Uncategorized

डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण तात्काळ थांबवा ( अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ; समता दलाचे उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन )

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील जुन्या नाक्याच्या खुल्या जागेवरील होत असलेले अतिक्रमण तात्काळ थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समता सैनिक दल उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी विचाराची जनता राहते. वर्षातील साजरे होणारे 14 एप्रिल, 6 डिसेंबर, धम्मचक्र परिवर्तन दिन व संविधान दिवस अशा अनेक सोहळ्यासाठी शहरातील आंबेडकरी जनता ही डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात जमत असते. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन ही केले जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जुन्या नाक्यावर असलेली खुल्या जागेचा वापर अशा सोहळ्याच्या दरम्यान बहुदा केला जातो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता उस्फुर्तपणे कार्यक्रम घेत असते. त्यासाठी ही जागा अतिशय सोयीची आहे . मात्र या ठिकाणी गत आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण सुरू असून सदर अतिक्रमण येत्या दोन दिवसात तात्काळ थांबविण्यात येऊन, जागा खुली करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समता सैनिक दलाच्या उमरखेड चमूने केले आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यावेळी समता सैनिक दलाचे संघटक विनोद बरडे, संतोष जोगदंडे, शुद्धोदन निखाते, सुशांत धोंगडे, अनिल धोंगडे, सिद्धार्थ धोंगडे, सुमित दवणे, सुभाष शिंगणकर, कैलास धोंगडे, कुलदीप खडसे, सतीश खाडे, राजू दोडके, विशाल पडघणे, प्रतीक धोंगडे, सचिन वाहुळे, आदित्य शिंगणकर, दिनेश गायकवाड, मिलिंद धोंगडे, रमेश हनवते आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!