लोकनेते स्व.नारायणराव पाटील वानखेडे यांच्या पुण्यतिथी निमित्त व सहकारमहर्षी स्व. पंजाबराव माने यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
स्व. भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्री तेजमल गांधी कृषी विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालय तथा व्यावसायिक अभ्यासक्रम, ब्राम्हणगांव यांचे कडून दान दिलेली ५०० वृक्ष महादेव मंदिर समिती परजना यांना लागवडीकरीता समर्पित करून उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले. लोकनेते स्व.नारायणराव पाटील वानखेडे यांच्या पुण्यतिथी व सहकारमहर्षी स्व. पंजाबराव माने यांच्या जयंतीनिमित्त आज श्रावण सोमवार ला महादेव मंदिर टेकडी परिसर परजना या ठिकाणी वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना माननीय श्री डॉ. विजयराव माने साहेब (असोसिएट डीन अन्न व तंत्र महाविद्यालय यवतमाळ) यांनी यावेळी बेल वृक्ष लागवड करून अभिषेक करताना बेलाच्या झाडाचे पाने तोडून पूजा करण्या ऐवजी बेलाचे वृक्ष लागवड करून अभिषेक करावा असे आव्हान भक्तांना केले तसेच पूजेदरम्यान देवस्थानला भरपूर नारळ वाहिले जातात त्यातील पाणी असलेले नारळ देवस्थानाने स्व. भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेस दिल्यास त्या नारळाची रोपटे करून परत देवस्थानाला परिसरात वृक्ष लागवड करण्यासाठी कमी खर्चात नारळाचे रोप निर्माण होईल व श्रमदानातून त्याची लागवड करून परिसर हिरवा करून सर्वांनाच प्राणवायू उपलब्ध होऊन आरोग्य तंदुरुस्त ठेवता येईल. दक्षिण -पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यासोबत ब्राम्हणगांव या गावाला याचा मुबलक प्राणवायू निश्चित मिळेल याची शास्त्रीय माहिती भक्तांना यावेळी डॉ.माने यांनी दिली तसेच सर्वांच्या सहकार्यातून पुढील वर्षी ५००० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महादेव मंदिर परजना येथील अध्यक्ष नीलकंठ वाघमारे ,उपाध्यक्ष सुभासराव सावंत,सचिव विश्वासराव वाघमारे ,गजाननराव वाघमारे दत्तराव माने व समितीचे सर्व सदस्य तसेच शिवाजीराव माने (अध्यक्ष जिन प्रेस उमरखेड)परजना येथील सरपंच प्रतिनिधी अशोकराव वाघमारे,उपसरपंच संजयराव सावंत,मंदिराचे पुजारी सभाजिराव मुदगुलकर तसेच ब्राम्हणगांव चे सरपंच परमात्मा गरूडे,प्रतिष्ठित नागरिक रत्नाकर अण्णा मुक्कावार,माधवराव कोथळकर,अरविंदराव धबडगे, नयन पूदलवाड, अशोकराव निमलवाड, नागनाथ ढोले,गजानन कोंडरवाड (मोक्षधाम समिती अध्यक्ष) चातारीच्या सरपंच सौ रंजनाताई माने प्रतिष्ठित नागरिक दादाराव पाटील माने चंद्रकांतजी पवार,राज विजयराव माने, शिवाजी नरवाडे पत्रकार निळकंठराव धोबे, सुभाषराव वाघाडे, विजयराव कदम प्राचार्य सादुडे सर,बँकेचे अध्यक्ष अशोकराव शिरफुले सर व ईतर मान्यवर मंडळी तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी तसेच भाविक भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सुनील वानखेडे यांनी तर आभार शिरफुले सर यांनी मानले.
बॉक्स…
महादेवाला अभिषेक करतांना बेल वृक्षाचे पाने तोडून पूजा न करता बेलाचे वृक्ष लागवड करून अभिषेक करावा. देवस्थानाला वाहिलेले पाणी असलेले नारळ भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेला दिल्यास त्याचे रोपात रूपांतर करून आम्ही त्या देवस्थानाला त्या नारळाचे रोप निर्माण करून देऊ व पुढील वर्षी याच वृक्षाची लागवड देवस्थानच्या परिसरात करावी.