Uncategorized

प्रशांत दांगट यांची पोलीस उपनिरीक्षक पदीनिवड प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एमपीएससी परीक्षेत यशस्वीगोवाचे मनोज केशव शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या

: स्नेहा उत्तम मडावी प्रतिनिधी पुणे

निरगुडसर ता. आंबेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रशांत बबन दांगट यांचा नुकताच एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल लागला असून प्रशांत याने ४४० पैकी ३४९ गुण मिळवून त्याचा राज्यात सहावा क्रमांक आला आहे. त्याने मिळवलेल्या यशा बद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याच्या पोलीस उपनिरीक्षक पदी निवड तर निरगुडसर गावी त्याच्या प्रशांत यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंगडेवाडी, रत्नभूमी विद्यालय रामजी नगर घाटकोपर, माध्यमिक शिक्षण पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निरगुडसर, उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व अण्णासाहेब आवटे कॉलेज येथे झाले. पुणे येथील मॉडर्न कॉलेज येथे बीएससी पदवी प्राप्त केली आहे.. आबेदा इनामदार कॉलेज पुणे येथे एमस्सी पदवी प्राप्त केली आहे. लांडेवाडी येथील कॉलेजला बीएड चे शिक्षण पूर्ण केले. काही काळ गेनबा मोझे कॉलेज येथे शिक्षकाची नोकरी केली. नोकरी करत असताना बरोबरचे अनेक मित्र, मैत्रिणी एमपीएससी चा अभ्यास करत असल्याने त्यांचीच प्रेरणा घेऊन व पोलिस दलाबद्दल आवड निर्माण झाल्यानंतर प्रशांत याने एमपीएससी चा अभ्यास सुरू केला पोलिस

उपनिरिक्षक ( पी एस आय ) २०२२ ची परीक्षा दिली व तो उत्तीर्ण झाला . यामध्ये त्याला ४४० पैकी ३४९ गुण मिळवून तो राज्यात सहावा आला आहे. प्रशांत हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असून त्याचे कुटुंबीय गावी शेतमजुरी तसेच भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. प्रशांत याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परीक्षेचे कुठलेही क्लास न लावता आपल्या मित्रांबरोबर पुणे ग्रंथालयात दिवस रात्र अभ्यास करून हे यश मिळवले आहे. त्याच्या यशात आई, वडील, दोन भाऊ, बहिण, व गोवा राज्यातील बिजनेसमेन मनोज केसव शिंदे यांचा आशिर्वाद आई वडील यांचा ही आर्शिवाद आहे मनोज शिंदे म्हणाले मी खूप आनंदित आहे प्रशांतदादाची निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा असेच आई वडिलांचे नाव रोशन करत राहो अशी ईस्वर चरणी प्रार्थना करतो मित्र परिवार, नातेवाईक यांचा मोलाचा वाटा आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!