Uncategorized

मुळावा, बिटरगाव, बोरी चालगणी मारलेगाव निमगाव ब्राह्मणगाव परिसरात हैदोस, पायबंद घालण्यासाठी खोदलेले खड्डे बुजविले

पैनगंगेतील रेतीघाट तस्करांच्या हवाली

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

उमरखेड। ता. महसूल व
पोलीस प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पैनगंगा नदीपात्रातील अनेक रेतीघाट सध्या तस्करांच्या हवाली असल्याची स्थिती आहे. मुळावा, बिटरगाव, बोरी चालगणी साखरा खरुज मारलेगाव निमगाव ब्राह्मणगाव परिसरातून अहोरात्र रेतीचे उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरने हजारो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. मध्यंतरी महसूल यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवरच हल्ला चढविण्यापर्यंत मजल गेलेल्या रेतीतस्करांवर एमपीडीए सारखी प्रभावी कारवाई झाली नसल्याने या भागात तस्करांचा हैदोस वाढला आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांनी गतवर्षी लोकाभिमुख रेतीधोरण बनवित असल्याची घोषणा केली. त्यातून नदीपात्रातील रेतीघाटांचे परंपरागत लिलाव बंद करून डेपो उघडण्याची संकल्पना स्वीकारली. केवळ ६५० रुपये ब्रासमध्ये रेती सामान्य नागरिकाला उपलब्ध होईल, असे ‘चॉकलेट’ दाखविले. प्रत्यक्षात जिल्ह्यात काही रेती डेपो उघडण्यात आले. मात्र, या डेपोच्या आडूनच सर्वात मोठी रेती तस्करी बिनदिक्कत

तलाठी-मंडळ अधिकारी मालामाल
मुळावा परिसरातील तलाठ्याने काही रेती तस्करांसोबत स्नेहबंध जोडले आहे. त्याच्या मधुर संबंधातून वरपर्यंत वाटा पोहोचविला जात असल्याची खात्रीलायक माहिती पुढे येत आहे. त्याचबरोबर ब्राह्मणगाव भागातील एका मंडळ अधिकाऱ्यानेही रेतीच्या या चोरट्या व्यवसायात मोलाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते. दोघांचेही कारनामे पुढे आले आहे. विशेष म्हणजे पोलीस यंत्रणेतील ‘त्या’ कर्मचाऱ्यांकडे असलेल्या वसुलीचाही विषय सध्या सर्वश्रुत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या भागातील रेती तस्करीवर अंकुश लावावा, अशी जोरदार मागणी आहे.

सुरू आहे. हप्ता संस्कृतीचे पाप लपविण्यासाठी हे डेपो प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्यांसाठी
सुलभ ठरले आहे. दरम्यान, उमरखेड तालुक्यात रेती तस्करांचा पैनगंगा नदीपात्रात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!