सामाजिक

कोरटा – किनवट महामार्गावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे, जनसेवक भाविक भगत

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

महागाव : काल भाविक भगत दराटी येथे जात असताना कोरटा तू किनवट रस्त्यावर मोठे खड्डे त्यांच्या निदर्शनास आले. खड्यात पाणी की पाण्यात खड्डे हे वाहनधारकांना कळेनासे झाले होते. खड्यात पाणी साचल्यामुळे नवीन वाहनांना खड्डे दिसत नसल्यामुळे मोठा अपघातही होऊ शकतो. त्यामुळे भाविक भगत यांनी कोरटा येथील

नागरिकांना सोबत घेऊन खड्यातील पाणी स्वतः नाली खोदून रोडच्या बाजूला वळते केले. त्यामुळे वाहनधारकांना किमान खड्डे दिसल्यामुळे वाहन चालविणे शक्य झाले. या नंतर भगत यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर कोरटा किनवट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगितले. आज बंदी भाग हा शेकडो समस्यांनी ग्रासलेला असून बंदी भागामध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते या महत्त्वाच्या समस्या आजही कायम आहेत. या भागात आजही फारसे लक्ष दिले गेले नसून या भागासाठी काम करणार असल्याचे रुग्णसेवक, आरोग्यदूत, जनसेवक भाविक भगत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!