गुलाम नबी आझाद उर्दु प्राथमिक शाळेतर्फे बाल आनंद मेळावा संपन्न

सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
पुसद (दि.22 जानेवारी) येथील गुलाम नबी आझाद उर्दु प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय राठोड साहेब गट विकास अधिकारी पं.स.पुसद तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सुशीला आवटे मॅडम गटशिक्षणाधिकारी पं.स पुसद, मा.अमर राठोड शालेय पोषण आहार अधीक्षक पुसद, मा. अमित बोजेवार साहेब विस्तार अधिकारी पं.स.पुसद, मा.उत्तम चव्हाण विस्तार अधिकारी पं.स पुसद,मा.विनायक भांगे विस्तार अधिकारी पं. स पुसद, मोहंम्मद अकील सर (माजी केंद्र प्रमुख), मोहंम्मद सादिक सर (प्राचार्य गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पुसद).सुधीर बहादुरे (बि.आर.सी पुसद), लक्ष्मण वाघमारे (बी.आर.सी,पुसद) , मा. दिलीप सारंगे (बी.आर.सी,पुसद) ईत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थीत होते.
या मध्ये वर्ग 1ली ते 4थी च्या विद्यार्थ्यांनी नाना प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार करून या मेळाव्यात सादर केले तसेच सोबत पालकांनी सुद्धा या मेळाव्यात सहभाग नोंदविला. या बाल मेळावा घेण्यामागे हा उद्देश होता की विद्यार्थांना दैनंदिन व्यवहारिक आर्थिक गोष्टीची माहिती व्हावी. या बाल आनंद मेळाव्याची सुरवात ही वर्ग 4 थीच्या सय्यदा फातेमा वाजीद हुसैन हिने पवित्र कुराण पठणानाने केली.
या नंतर आलेल्या प्रमखु पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाजीद सरांनी केले तर सूत्र संचालन मराठीत सय्यद सलमान सरांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजय राठोड सरांनी कार्यक्रम बघून आनंद व्यक्त केला आणि आपले मनोगत सुद्धा विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन मुख्याध्यापिका मा.सायका तब्बसुम मॅडमचे लाभले तसेच या मेळाव्याच्या आयोजनामध्ये सय्यद वाजीद हुसैन सर,साबीर सर, असरार सर, रिजवाना मॅडम, वहिदा बानो,नाझेमा नसरीन, शफिकुंनिसा सिद्दिका मॅडम यांनी तसेच हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.अशा प्रकारे बाल आनंद मेळावा मोठ्या आनंदात पार पडला.