Uncategorized

उमरखेड येथे शांतता कमिटीची बैठक : महाआरतीचे आयोजनउमरखेड शहरात सतरा मंदिरात एलईडी स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपण

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

उमरखेड:- संपूर्ण भारतात दिनाक २२ जानेवारी रोजी श्रीराम प्रभूची अयोध्या येथील मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रति दिवाळी म्हणून समाजातील सर्व स्तरावरील लोक सहभागी होणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन या निमित्ताने उमरखेड येथील नागरिकांनी दक्ष सतर्क राहून हिंदू मुस्लिम एकतेचे एक मूर्तिमंत उदाहरण सर्वांसमोर ठेवावे असे प्रतिपादन शांतता कमिटीच्या बैठकीत अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांनी केले दिनांक २० जानेवारी रोजी पोलीस स्टेशन उमरखेड येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियूष जगताप हे होते तर प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी तसेच पोफाळी, बिटरगाव (बू) महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुद्धा उपस्थित होते. पृथ्वीवर वावरणारे सर्वच मानव जात एकाच परमेश्वराची लेकरे असून एकमेकांप्रती दुजाभाव नसावा असा संदेश संपूर्ण जगाला भारत देशाने दिला आहे. त्यामुळे शांततेत २२ जानेवारी चा सोहळा पार पाडावा असे मत महसूल प्रशासनामार्फत नायब तहसीलदार वैभव पवार यांनी व्यक्त केले. नगरपरिषद उमरखेडचे डेप्युटी सीईओ यांनी सदर २२ तारखेच्या कार्यक्रमानिमित्त शहरातील स्वच्छता व शांतता कमिटीच्या सूचनेस प्राधान्य देऊन पूर्ण करण्याची आश्वासन दिले आहे. अक्षदा समितीचे अध्यक्ष अजय पांडे यांनी शांतता कमेटीला संबोधित करताना दिनांक १ जानेवारी ते २० जानेवारी पर्यंत ४० मंदिरात विशेष कार्यक्रम राबवून महाआरतीची तसेच पंधरा हजार घरात म्हणजे साठ हजार लोकांना अक्षदा वितरण करण्यात आल्याचे सांगितले तसेच २२ तारखेला अयोध्या येते प्रभू श्रीरामाचे मंदिराची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमीत्य शहरातील सतरा मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपण दाखविण्याचे तसेच महाआरती, महाप्रसाद, हनुमानचालीसा पठण, अशा स्वरूपात कार्यक्रमाचे नियोजनाची माहिती दिली. उमरखेड तालुका दैनिक पत्रकार संघाचे चे अध्यक्ष विजय आडे यांनी सांगितले की सर्व समाजातील लोकांनी गेल्या अनादी काळापासून चालत आलेल्या व वर्तमानात होऊ घातलेल्या सोहळ्यास आपण सर्वांनी सहभागी होऊन आनंदाने उत्साहाने सोहळा साजरा करावा आणि शहरास कुठलीही अनुचित प्रकार घडू नये याबाबत काळजी घ्यावी अशा स्वरूपात आपले मत व्यक्त केले. एका ऐतिहासिक क्षणाचे भागीदार आपण दिनांक २२ तारखेला होणार असून प्रति दिवाळी म्हणून आपण हा सोहळा साजरा करणार आहोत शहर आपले आहे सण आपला आहे त्यामुळे शहरची आणि सणाची जबाबदारी आपली आहे त्यानंतर प्रशासनाची जबाबदारी आहे याची दक्षता उमरखेड मधील सर्व नागरिकांनी घ्यावी याबाबत सूचना भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी केले तर कार्यक्रमाला शांतता कमिटीचे सदस्य शहरातील प्रतिष्ठित नागरिक मुस्लिम बांधव राजकीय नेते महिला दक्षता पथक व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!