Uncategorized

कारसेवकांचा सत्कार •भक्तिमय गीतांवर तरुणांनी धरला ठेका

शहनाज अख्तरच्या भजनाने राममय झाली औदुंबरनगरी

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठ सोहळ्याची उमरखेडकरांना अनुभूती मिळावी म्हणून 19 जानेवारीला भाजपच्यावतीने येथील मैदानावर सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा श्रीराम भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. गावागावात महाअभिषेक, महाआरती, हनुमान चालीसा पठण, कीर्तन, सप्ताह, भजन संध्या, महाप्रसाद
वाटप, मंदिराची स्वच्छता, रंग-रंगोटी शोभायात्रा आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
19 जानेवारी रोजी शहनाज अख्तर यांच्या भजन संध्या कार्यक्रमाणे परिसर राममय झाला होता. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वीच शहरातील वातावरण राममय झाले आहे. यावेळी आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा व अतुल खंदारे, दिलीप सुरते, किसन वानखेडे, सुधाकर लोमटे, आदित्य माने यांच्या हस्ते तालुक्यातील कार सेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व रामभक्त ‘ये भगवा रंग’ या गीतावर ठुमके देत भक्तीमय वातावरणाचा आनंद घेत होते. यावेळी संपूर्ण परिसर रामाच्या भक्तीने दुमदुमले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!