नारी शक्ती ( राष्ट्रीय स्तर ) पुरस्कार मिळाल्या बद्दल ॲड . अस्मिता टाकणखारे यांना शुभेच्छा देत शिवसेनेने केला सत्कार

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड:-भाजपा महिला शहर प्रमुख असलेल्या ॲड .अस्मिताताई यांनी अनेक महिलांना पक्षात जोडण्याचे महत्कार्य केले
सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाज हिताचे कार्य करणाऱ्या वकिली व संघटनेच्या माध्यमातून गरजू महिलांना मदत तसेच मुलींना मार्गदर्शन केल्यामुळे ॲड . अस्मित टाकणखारे (आढाव ) अखिल भारतीय प्रतिभा सन्मान सोहळ्यात पुणे येथे त्यांचा सत्कार करून ‘नारीशक्ती ‘ पुरस्कार देण्यात आला
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या , पुरस्कार प्राप्त ॲड . अस्मिताताई यांचा शिवसेनेने सत्कार करून पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख ॲड संजिवकुमार जाधव , शहर संघटक अमोल सुर्यवंशी ,अनुसुचित जाती सेलचे तालुका अध्यक्ष ॲड. अजय पाईकराव , ॲड . भुषण देवसरकर , ॲड . नागेश चांदले , सुनिल शहाणे , संदिप चंद्रवंशी , महिला उपशहर प्रमुख सारिकाताई कोकांडे , उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर , प्रसिद्धी प्रमुख राजु गायकवाड आदि शिव सैनिक उपस्थित होते