Uncategorized

जिल्हाधिकाऱ्यांकडून उपविभागीय कार्यालयातील कामांचा आढावा

तहसीलमधील अभिलेखागार विभागाची केली पाहणी

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी दि. २० डिसेंबर रोजी उमरखेड उपविभागीय कार्यालयात आढावा सभा घेतली. या आढावा सभेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या कामांचा आढावा घेतला.

या सभे अगोदर जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी तहसील कार्यालयातील अभिलेखागार विभागाची पाहणी केली. ही पाहणी करतांना त्यांनी विभागातील नोंदवही बरोबर आहे किंवा नाही, नोंदी कशा प्रकारे घेतल्या आहेत. प्राप्त अर्जाच्या नोंदी आदी बाबींची तपासणी त्यांनी यावेळी केली.

या तपासणीवेळी उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड, तहसीलदार डॉ आनंद देउळगांवकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी प्रविण वानखडे, उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपविभागीय अभियंता उ. पै. प्रकल्प, तालुका कृषि अधिकारी, जि. प. बांधकामचे उपविभागीय अभियंता, नगर परिषदेचे मुख्याधिकारी , सहायक वन संरक्षक, महावितरणचे उपविभागीय अभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक, पशूवैद्यकीय अधिकारी, वनपरीक्षेत्र अधिकारी, पोलीस निरिक्षक, बिटरगाव पोफाळी , दराटीचे गटशिक्षणाधिकारी, शाखा अभियंता पाटबंधारे आदी विभागाची अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!