कृषीदूतांनी दिले गाजर गवत निर्मूलनाचे धडे

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
अंशुमान राऊत अथर्व काकड़े समीर घुमड़े
दुर्गेश इंगोले अनुराग तुरक गौरव पूरमे सुहास राऊत गाजर गवत हे बारमाही तन असून, दिवसेंदिवस याचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टोरीफोरस असे आहे. गाजर गवताचा मानवी आरोग्यासहित पिक उत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. सदर सप्ताह मध्ये गाजर गवत निर्मूलनासाठी जागरूकता करण्यात आली. याद्वारे गाजर गवताचे एकात्मिक पद्धतीने निर्मूलन करण्यासाठी महाविद्यालद्वारे जनजागृती करण्यात आली. गाजर गवताचे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी “झायगोग्रामा बायकोलाराटा” हे किडे सोडण्यात आले व त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन आजूबाजूच्या परिसरात गाजर गवताचे निर्मूलन केले. उपक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चिंताले यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव
कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. वाय. एस. वाकोडे, प्रा. ए. बी. तामसेकर, प्रा. ए. एस. राऊत, प्रा. ए. बी. इंगळे, प्रा. के. एस. आगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक पार पडले.