Uncategorized

ग्रामपंचायतसह कॉलेज व एमआयडीसीच्या ३ विहिरीत शिरतेय घाणपाणी, राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराकडून लेंडी नाला बुजला दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांसह हजारो लोकांचा जीव धोक्यात

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात आंबवण तलावातून येणारा नाला कंत्राटदाराने बुजविला. परिणामी, या नाल्यालगतच्या तिन्ही विहिरींमध्ये घाण व सांडपाणी शिरत आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांसह सात हजार नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे.

शहरातून गेलेल्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय-३६१ महामार्ग, हा ढाणकी मार्गावरील बायपास रोडवरील उड्डाणपुलाचेकाम सुरू होते. तेव्हा संबंधित कंत्राटदाराने, आंबवण तलावातून येणारा नाला बुजवला आहे . या नाल्यावर ३ विहिरी असून, रूपाळा नागापूरच्या ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीसह गावंडेकॉलेज व एमआयडीसीची विहीर अश्या तीन विहिरी आहे. सध्या या विहिरीतघानवसडलेलेदूषितपाणीशिरत आहे. यामुळे जवळपास १० हजार लोकांच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग निर्माण झाला असून, साथीचे आजार पसरण्याची भिती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित यंत्रणेला बुजलेला नाला खोदकाम करून सुरळीत करण्याचे तत्काळ आदेश द्यावे, अशा आशयाचे निवेदन रूपाळा नागापूर ग्रामपंचायतने एसडीओंना ८ जानेवारीला निवेदन दिले. मात्र अजून कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

ढाणकी रोडवरील उमरखेडबायपास उड्डाण पुलाजवळील पूर्वबाजूने असलेला लेंडी नाला, कंत्राटदाराने बुजविला होता. या नाल्यामध्ये येणारे शहरातील सांडपाणी रुपाळा – नागापूर ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याच्या सार्वजनिक विहिर, गावडे कॉलेजच्या विहिरीसह एमआयडीसीच्या विहिरीत जात आहे. गावंडे कॉलेजच्या जवळपास चार हजार विद्यार्थ्यांसहित, तीन हजार गावकऱ्यांच्या पिण्याचे पाणी दूषित होऊन, डायरिया, कॉलरा, टायफाईड असे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!