शेत शिवारात जाऊन कृषीकन्यांनी केली माहितीची देवाणघेवाण…

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
स्थानीक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय उमरखेड च्या कृषीकन्यांनी शेतशिवारात जाऊन विशेष प्रकल्प राबविला. यावेळी कृषीकन्या कु. कल्याणी वि. आंबटकर आणि गृप यांनी कृषिभूषण आनंद दिनकरराव गोविंदवर यांच्या शेतात असलेल्या आनंद शेती फार्मा याची केली पाहणी. यावेळी बरीचशी माहितीची देवाणघेवाण झाली. कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना आपण शेती मध्ये नवनवीन प्रयोग करून आपले वार्षिक उत्पन्न कसे वाढवु शकतो याची माहिती पटवुन दिली तर माहिती सांगत असतांना शेतकऱ्यांकडून उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.
उपक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चिंताले यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. वाय. एस. वाकोडे , प्रा. ए. बी. तामसेकर, प्रा. ए. एस. राऊत, प्रा. ए. बी. इंगळे, प्रा. के. एस. आगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक पार पडले…