सिध्दार्थ दिवेकर यांना रिपब्लिकन वार्ता समुहा कडून उत्कृष्ट पत्रकारिता समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

रिपब्लिकन वार्ताचा ३ वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळा संपन्न
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड :- (दि.२६ नोव्हेंबर) संविधान दिनाचे औचित्य साधून
रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीचा तृतीय वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन सोहळा आणि सामाजिक ,आरोग्य, पत्रकारिता व शासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजरत्न या पुरस्काराने सन्मानित कार्यक्रम रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता व्यापारी भवन वासवी माता चौक डुबेवार लेआउट केमिस्ट अँड ड्रगिस्ट बाजूला पुसद जिल्हा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलिताचे कैवारी संपादक भिमराव कांबळे, प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन वार्ता तथा वृत्तवाहिनी संपादक डॉ. अनिल आठवले, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बुध्दरत्न भालेराव, जेष्ठ प्रत्रकार दै.सकाळ प्रा.दिनकर गुल्हाने,से.नि. समाजकल्याण आयुक्त माधव वैद्य ,जेष्ठ साहित्य लेखक विलास भवरे, माजी प्रज्ञापर्व समिती अध्यक्ष विठ्ठल खडसे,प्रा.महेश हंबर्डे,

स्वागतोउत्सुक म्हणून मुख्य संपादक डॉ. अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद, उपसंपादक विदर्भ राजेश ढोले,संचालक साहेबराव पवार,केळापुर प्रतिनिधी हनुमंत लसंते,पुसद प्रतिनिधी कैलास श्रावणे,वि. प्रतिनिधी नाशिक आनंद दाभाडे, सीनियर एडिटर युवराज इंगेकर, संभाजीनगर जि. प्रतिनिधी अकबर शाह, गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे, पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, देवणी लातूर प्रतिनिधी समीर मोमीन, भोकरदन जालना प्रतिनिधी मजहर पठाण, ज्ञानेश्वर मेटकर, विजय निखाते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम २६/११ मध्ये शहीद झालेल्या पोलिसांना मानवंदना देण्यात आली. तसेच संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
त्यानंतर रिपब्लिकन वार्ताच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने यवतमाळ जिल्ह्यातील एकूण ६० पुरस्कारार्थीना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यामध्ये उमरखेड येथील उत्कृष्ट पत्रकारिता समाजरत्न पुरस्कारासाठी दैनिक प्रबुद्ध परिवार, दैनिक सचित्र न्यूज, पुरोगामी संदेश, उमरखेड वार्ता नेहमी अग्रेसर असणारे पत्रकार सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर यांना रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी व वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक डॉ. अनिल आठवले यांच्या हस्ते भव्य सत्कार प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विदर्भ उपसंपादक राजेशभाऊ ढोले केले होते.
कैलास श्रावणे, हनुमंत लसंते यांनी परिश्रम घेतले.
यावेळी पुरस्कारार्थी,वाचक प्रेक्षक, जाहिरातदार, इलेक्ट्रॉनिक मीडिया तथा दैनिक वर्तमानपत्राचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंपादक विदर्भ राजेश ढोले यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रा.आर. पी. गवई यांनी केले.
