Uncategorized

सोन्याचे दागिने चोरी करणारी अज्ञात महिलेस २४ तासाचेआत अटक करुन चोरीच्या गुन्हयातील संपर्ण मुद्देमाल केला हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

दिनांक २०/०८/२०२५ रोजी दिवसा दारव्हा शहरातील श्री. शिवम विजय पाले यांचे शिवकृपा ज्वेलरी दुकानामध्ये एका अनोळखी बुरखा घातलेल्या महिलेने ०४ जोड सोण्याचे कानातील लटक किंमत अंदाजे ६०,०००/- रुपये चोरी करुन नेले. सदरची घटना शिवकृपा ज्वेलरी दुकान मालक श्री. शिवम विजय पाले रा. दारव्हा यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दिनांक २२/०८/२०२५ रोजी पोलीस स्टेशन दारव्ह येथे येऊन दागिने चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन दारव्हा येथे दिली. त्यावरुन दिनांक २२/०८/२०२५ रोजी पोलीस स्टेशन दारव्हा येथे अपराध क्रमांक ५५६/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास करीत असतांना गोपणीय बातमीदाराचे माहितीवरुन नेहरु नगर जिल्हा अकोला येथून संशयीत महिला मुमताज परविन अब्दुल शकील, वय ६५ वर्ष हिला ताब्यात घेऊन तिचेकडे कौश्यल्यपुर्वक चौकशी केली असता सदर आरोपी महिले कडुन गुन्हयात चोरी गेलेले ०४ जोड सोण्याचे कानातील लटकन वजन १२.६७० ग्राम किंमत अंदाजे ६०,०००/-रुपये जप्त करण्यात आले. सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशन दारव्हा यांचे ताब्यात देण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन दारव्हा हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात श्री. सतिश चवरे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. सपोनि पवन राठोड, पोलीस अंमलदार बबलु चव्हाण, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button