नवीन जि. प. प्रा. शाळा नेहरूनगर क्र. २ मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात; शैक्षणिक साहित्य वाटप व भव्य वृक्षारोपण!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वावर नवीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरूनगर क्र. २, हिमायतनगर येथे अत्यंत थाटात आणि प्रेरणादायी वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व स्वच्छतागृहाचे आश्वासन
या प्रसंगी वॉर्ड क्र. १५ च्या नगरसेविका प्रतिनिधी शेख इलियास यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या (कॉपी), पेन आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. शाळेत स्वच्छतागृह नसल्याची अडचण शिक्षकांनी निदर्शनास आणून देताच, शेख इलियास यांनी औदार्य दाखवत स्वतःच्या खर्चातून सुसज्ज स्वच्छतागृह उभारून देण्याचा शब्द दिला.
वन विभाग अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळा परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वन विभागाचे (फॉरेस्ट डिपार्टमेंट) अधिकारी, नगरसेविका प्रतिनिधी शेख इलियास आणि वॉर्ड क्र. ५ चे नगरसेवक प्रतिनिधी .अब्दुल कलीम.शेख जब जबी . शेख जुबेर यांनी स्वतः आपल्या हाताने झाडे लावून निसर्ग रक्षणाचा संकल्प केला.
या कार्यक्रमास:
वन विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी
स्थानिक पत्रकार बंधू
विद्यार्थी व त्यांचे पालक
मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.



