भाजपाचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना विधान परिषदेत संधी देण्याची मागणी

सहसंपादक शेख मुजाहिद मो. 7798306192
उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या कडून माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना विधान परिषदेत आमदार म्हणून पाठविण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या इंगळे यांनी आपल्या कारकीर्दीत पक्ष संघटन मजबूत करत जनतेशी सातत्याने संपर्क ठेवला असून आजही ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
उत्तमराव इंगळे यांनी निवडणूक राजकारणात उल्लेखनीय कामगिरी करताना सन 1995 ते 99 पहिल्यांदा प्रकाश पाटील देवसरकर आणि अनंतराव देवसरकर यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला होता नंतर सन 2004 ते 2009 देवसरकरांचा उत्तमराव इंगळे यांनी पराभव केला त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ताकद वाढली आणि पुढील काळात दोन आमदार व एक नगराध्यक्ष घडविण्याचे श्रेय त्यांना दिले जाते त्यामुळे त्यांची संघटनात्मक ताकत आजही कायम असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे भाजपमध्ये एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या इंगळे यांनी पक्ष वाढीसाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत सत्तेत असो किंवा नसो त्यांनी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविला आहे सामाजिक शैक्षणिक आणि ग्रामीण विकासाच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
त्यामुळे त्यांना विधान परिषदेत संधी दिल्यास त्यांचे अनुभवाचा पक्षाला मोठा राजकीय फायदा होईल असे मत उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पातळीवर व्यक्त केले जात आहे दरम्यान या मागणीमुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मागणीला भाजपचे माजी तालुकाप्रमुख विलास कवाने भाजपचे माजी पदाधिकारी मोहन चव्हाण सुनील टेमकर तुकाराम भिसे संभाजी मुरमुरे तसेच आदिवासी समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे पक्षश्रेष्ठींनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन इंगळे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



