Uncategorized

महागांव येथे मध्यवर्ती प्रशासकीय महसूल कार्यालय येथे सरपंच पदासाठी सुधारित आरक्षण सोडत

तालुक्यातील गावागावात नेते कार्यकर्ते यांच्यात काही खुशी ! कही गम !चे वातावरण

महागांव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागांव येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय येथे महागाव तालुक्यातील सरपंच पदासाठी सुधारित आरक्षण सोडत 18 जुलै 2025 रोजी तहसील कार्यालयात उमरखेड उपविभागीय महसूल अधिकारी सखाराम मुळे महागाव निवासी तहसीलदार पवार व तालुक्यातील प्रगनामंडल अधिकारी यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी सोडत काढण्यात आली याआधी 23 एप्रिल तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामविकास विभागाने सरपंचपदाचे आरक्षण रद्द केले होते .त्यामुळे तेव्हापासून नागरिकांना नवीन आरक्षण सोडत कधी आहे याची उत्सुकता लागली होती शेवटी महागाव तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्चित 18 जुलै 2025 जाहीर करण्यात आली होतीमहागाव तालुक्यातील 76 ग्रामपंचायती सरपंच पदाचे आरक्षण करण्यात आले आहे दिनांक पाच मार्च 2025 ते 4 मार्च 2030 दरम्यान सार्वत्रिक निवडणुका द्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण निश्चित करण्याकरिता महागाव तालुक्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नामप्र महिला सर्वसाधारण आरक्षणासह सरपंच पदाकरिता सुधारित सोडत काढण्यात आली आहे .या सरपंच पदासाठी सोडत खालील प्रमाणे आहे .
सर्वसाधारण पुरुष :
साई ई.,शिरपूर , भोसा , आमणी बु. ,धनोडा , मोरथ ,काळी दौलत खान , पेढी ई . , मोहदी, वडदब्रम्ही , घाणमुख ,वनोली ,करंजखेड , घोनसरा ,माळवागद, इजनी ,तुळशी नगर ,कोठारी,पिंपळगाव ई .
सर्वसाधारण महिला :
हिंगणी ,चिंचोली,वाकोडी, लेवा ,वेणी बु ., वरोडी ,सारकिन्ही ,कान्हा,करंजी ई. ,आनंतवाडी ,पोखरी ई . ,बोरी ई . ,काळी टेंभी,कासोळा,चिंचपाड ,तर ईश्वर चिट्ठीने घाणमुख ईश्वरचरणी लोहरा खुर्द ईश्वर चिट्ठीने उटी सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाले
मागास प्रवर्ग ओबीसी पुरुष :
कलगांव ,अंबोडा ,दहिवड खुर्द,बोथा ,चिल्ली ई. ,मलकापूर ,धारमोहा ,कवठा थार बुद्रुक,बिजोरा ,आमणी खुर्द ,वाकाद ई .
मागास प्रवर्ग महिला ओबीसी :
हिवरी ,माळेगाव ,डोंगरगाव ,मलकापूर,फुलसावंगी ,माळकिन्ही,सवना , कासारबेळ ,टेंभुरदरा हे सर्व गावे महिला प्रवर्ग ईश्वर चिकेने काढण्यात आली
अनुसूचित जमाती पुरुष (एसटी) :
खडका,चिलगव्हाण , गुंज , तिवरंग ,पिंपळगाव , कान्हा ,
अनुसूचित जमाती (एसटी ) महिला :
भांब,कोंडगाव , वाघनाथ ,दहिसावळी थेट आरक्षण महिला तर वाकान ग्रामपंचायतचे आरक्षण ईश्वर चिट्ठीने काढण्यात आले .
अनुसूचित जाती पुरुष ( एस .सी .) :
हिवरा,राहुर ,बेलदारी ,वडद मु .
अनुसूचित (एस . सी . )जाती महिला :
कोंदरी ,दगडथर , टेंभी,पोंहडुळ ,शिरफुल्ली,
अशाप्रकारे महागाव तालुक्यातील सुधारित सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली .यासाठी उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे महागाव तहसीलदार निवासी नायब तहसीलदार पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक कायंदे यांच्या पोलीस बंदोबस्ता प्राकृत अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील प्रत्येक गावातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button