शहर

हिमायतनगरच्या मुख्य रस्त्यावरील धुळीचा प्रश्न मार्गी लावा; टायगर सेनेचे मुख्याधिकाऱ्यांना जनहितार्थ निवेदन

​
​हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: शेख खय्यूम
​हिमायतनगर: शहरातील विकासकामांच्या दरम्यान उद्भवणाऱ्या धुळीच्या त्रासामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी ‘ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना’ हिमायतनगरच्या वतीने नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. कोणत्याही वादापेक्षा ‘जनहित आणि काम’ महत्त्वाचे असल्याचे सांगत, प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
​आंबेडकर चौक ते परमेश्वर मंदिर या मुख्य मार्गावर सरकारी रुग्णालय, मुख्य पोस्ट ऑफिस, शाळा आणि बाजारपेठ आहे. या भागातून संपूर्ण तालुक्यातील नागरिक ये-जा करतात. सध्या रस्त्याच्या अवस्थेमुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास रुग्ण आणि विद्यार्थ्यांना अधिक होत आहे. भारतीय संविधानाच्या कलम २१ नुसार प्रत्येकाला सुदृढ आरोग्य आणि चांगल्या वातावरणात जगण्याचा अधिकार आहे, याच भावनेतून हे निवेदन देण्यात आले.
​प्रमुख मागण्या:
​जोपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत नागरिकांच्या आरोग्यासाठी दररोज नियमित पाणी फवारणी करण्यात यावी.
​कामाला गती देऊन जनतेला धुळीच्या त्रासातून कायमस्वरूपी मुक्त करावे.
​”आम्हाला कोणावरही टीका करायची नाही, तर फक्त जनतेचे काम व्हावे आणि लोकांचे आरोग्य जपले जावे हीच आमची प्राथमिकता आहे,” अशी भूमिका तालुका अध्यक्ष शेख युसूफ शेख महेबूब यांनी मांडली.
​यांच्या मार्गदर्शनाखाली हे जनहितार्थ निवेदन देण्यात आले:
​शेख खय्यूम (मराठवाडा अध्यक्ष)
​शेख मुजम्मिल (जिल्हा अध्यक्ष, नांदेड)
​शेख युसूफ शेख महेबूब (तालुका अध्यक्ष, हिमायतनगर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button