Uncategorized

माहिती अधिकार चळवळीचा मोठा विजय! राज्यव्यापी आंदोलनाला यश; सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले

मुंबई / उमरखेड, दि. २ जुलै :

माहिती अधिकार कायदा कमकुवत करणाऱ्या नव्या नियमांविरोधात दि. २५ जून २०२६ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय आंदोलन यशस्वी ठरल्याचा दावा संघटनेने केला आहे. संस्थापक-अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या आंदोलनानंतर ज्येष्ठ समाजसेवक यांनीही माहिती अधिकार कायद्याच्या संरक्षणासाठी कठोर भूमिका घेत सरकारला इशारा दिला. त्यांच्या भूमिकेनंतर राज्य शासनाने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करत एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा सुरू असून, याला माहिती अधिकार चळवळीचा नैतिक विजय मानले जात आहे.

फेडरेशनने स्पष्ट केले की, माहितीचा अधिकार हा नागरिकांचा घटनात्मक लोकशाही हक्क असून, त्याला कमकुवत करणारे कोणतेही नियम स्वीकारले जाणार नाहीत. शासनाने पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी माहिती अधिकार कायद्याच्या मूळ उद्देशाला धक्का पोहोचवणारे सर्व निर्णय मागे घ्यावेत, अशी मागणी संघटनेने पुन्हा केली.

संघटनेने आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक संघटना आणि नागरिकांचे आभार मानत, “माहिती अधिकार वाचवा, लोकशाही मजबूत करा” हा लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

घोषणा:
“माहिती अधिकार संघटनेचा विजय असो!”
“लोकशाहीचा विजय असो!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button