शहर

महागाव नगरपंचायतीने भरले ४.७ लाखांचे वीज बिल; पाणीपुरवठा व लाईन सुरळीत


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत अंतर्गत प्रलंबित असलेले तब्बल ४ लाख ७ हजार ७९९ रुपयांचे वीज बिल नगरपंचायत अध्यक्षा रंजना आडे यांनी तातडीने भरून गावातील वीज लाईन पुन्हा सुरू करण्यात आली. यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे.
गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाकडून वेगाने कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नागरिकांनी देखील नगरपंचायतीला सहकार्य करत आपले कर (टॅक्स) वेळेवर भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून विकासकामांना गती मिळू शकेल.
याच पार्श्वभूमीवर महागाव शहरात स्वच्छता मोहिमेचीही जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे स्थानिक अध्यक्ष यांच्या पुढाकाराने मजूर लावून शहरातील साफसफाई व कचरा उचलण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सुरेश नरवाडे व नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.
महागाव शहरात स्वच्छ पाणी, नियमित साफसफाई आणि सुरळीत वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button