Uncategorized

आमणी MIDC कागदावरच; कोट्यवधींचे अनुदान गिळंकृत? उद्योग बंद, तरुण बेरोजगार


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील आमणी परिसरात मोठ्या अपेक्षेने उभारण्यात आलेल्या एमआयडीसीचा औद्योगिक विकास अजूनही कागदावरच अडकून पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीच्या गाजावाज्यात सुरू झालेल्या या प्रकल्पात प्रत्यक्षात अनेक उद्योग केवळ नावापुरतेच सुरू असून, काही ठिकाणी उत्पादन पूर्णपणे ठप्प असल्याचे चित्र आहे.
स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, अनेक उद्योगांनी केवळ सरकारी अनुदान उचलण्यासाठी नोंदणी केली. प्रत्यक्ष उत्पादन किंवा रोजगारनिर्मितीचा कोणताही ठोस परिणाम दिसून येत नाही. काही उद्योगांनी कागदोपत्री प्रकल्प दाखवून अनुदान मिळवल्यानंतर कारखाने बंद केल्याचेही समोर येत आहे. तसेच शेतकऱ्यांचे गहू फिल्टर करून दिल्या जात नाही .
औद्योगिक क्षेत्रात अपेक्षित विकास न झाल्याने तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या नाहीत. उलट अनेक प्लॉट रिकामे पडले असून, काही ठिकाणी मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. रस्ते, वीजपुरवठा आणि पाणी या अत्यावश्यक सोयींच्या कमतरतेमुळे उद्योग सुरू राहणे कठीण झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. तसेच काही जणांनी 90 आर जमीन उद्योगासाठी घेतली असता तिथे कोणताही उद्योग मोठा करण्यात आला नाही.
दरम्यान, जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही उद्योगांनी विविध शासकीय योजनांतर्गत आर्थिक लाभ घेतल्यानंतर उत्पादन बंद केले किंवा प्रकल्प केवळ कागदावरच दाखवले. यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या उद्योगांनाच परवानगी देऊन स्थानिकांना रोजगार मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
एमआयडीसीचा उद्देशच फसत असल्याने प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर काही जणांनी आपल्या जागा विकून लखोपतीझाले आहे याची चौकशी करणे गरजेचे झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button