शहर

सामाजिक सलोख्याचा जागर: आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडून मसुद खान लाला यांच्या निवासस्थानी ‘ईद’च्या शुभेच्छा!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
पवित्र रमजान ईदनिमित्त हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हिमायतनगर येथील मसुद खान लाला यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा देऊन सामाजिक सलोख्याचा आणि बंधुभावाचा नवा आदर्श निर्माण केला.
​या प्रसंगी बोलताना आमदार कोहळीकर म्हणाले की, “जेव्हा धर्माच्या भिंती गळून पडतात, तेव्हा कोणीही हिंदू किंवा मुस्लिम उरत नाही; आपण सर्व प्रथम भारतीय म्हणून एकत्र येतो. दिवाळी असो वा ईद, हे सण केवळ प्रेम आणि माणुसकीची शिकवण देतात.” त्यांच्या या विधानाने उपस्थितांची मने जिंकली.


​या सदिच्छा भेटीवेळी विकास पाटील देवसरकार, पोलीस निरीक्षक अमोल भगत,फेरोज खुरेशी महेबूब खान, मुख्तार खान, सय्यद आदिल, रहीम खान नगरसेवक संतोषभाऊ पोतन्ना अफरोज विरसनीकर डॉ इमरान शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष हरडपकर,वळसे पाटील आणि पत्रकार प्रकाश जैन खय्युम खरेशी पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदारांच्या या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button