Uncategorized

स्व. नानासाहेब साकळे यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण सोहळा संपन्न

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

उमरखेड येथील साकळे विद्यालयाच्या प्रांगणात स्व. नानासाहेब साकळे यांच्या पुतळ्याचे भव्यदिव्य अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला परिसरातील मान्यवर, नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या पुतळ्याचे अनावरण प.पू. गुरुवर्य माधवानंद महाराज (चिन्मयमूर्ती संस्थान, श्री क्षेत्र औदुंबर नगरी) तसेच डॉ. सखा महाराज जोशी (सेवानिवृत्त मुख्य आयकर आयुक्त, भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान स्व. नानासाहेब साकळे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पुंडलिक कुबडे (जिल्हा सचिव, भाजपा) आणि सौ. करुणा पुंडलिकराव कुबडे (नगरसेविका, नगर परिषद उमरखेड) उपस्थित होते. सोहळ्यात नगरसेविका सौ. करुणा कुबडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आदरणीय सौ. साकळे काकू, श्रीपाद देव साहेब, पाचकोरे सर, अनिकेत साकळे सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला असून, उपस्थितांनी स्व. नानासाहेब साकळे यांच्या कार्याला अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button