नगरसेवक जिशांन मिर्जांचा शब्द ठरला ‘शब्दप्रमाण’; नगरपंचायतीतून विशेष बजेट मंजूर करून प्रभाग ८ मध्ये दोन पुलांचे लोकार्पण!

हिमायतनगर ( तालुका प्रतिनिधी शेख खयुम ):
“निवडणुकीत दिलेला शब्द पाळणे हेच माझे कर्तव्य असून, प्रभागाचा सर्वांगीण विकास हीच माझी प्राथमिकता आहे,” असे प्रतिपादन नगरसेवक जिशांन मिर्जा यांनी केले. प्रभाग क्रमांक ८ मधील माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे आणि शेख रसूल यांच्या घरासमोरील नालीवर दोन नवीन पुलांचे (स्लॅब) काम पूर्ण झाले असून, त्याचे लोकार्पण मिर्जा यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात करण्यात आले.
नगरपंचायतीच्या विशेष निधीतून काम:
नगरसेवक दिशांत मिर्जा यांनी नगरपंचायतीकडे सातत्याने पाठपुरावा करून या कामासाठी विशेष बजेट मंजूर करून आणले. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात नाली ओलांडताना ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांची ही रास्त मागणी लक्षात घेऊन मिर्जा यांनी निधी उपलब्ध केला आणि दर्जेदार पद्धतीने हे काम मार्गी लावले.
जनतेत आनंदाचे वातावरण:
केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या मिर्जा यांच्या कार्यतत्परतेमुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. “बजेट मंजूर करून प्रत्यक्ष काम करणारा खंबीर लोकप्रतिनिधी,” अशा शब्दांत स्थानिक रहिवाशांनी त्यांचे कौतुक केले. या विकासकामामुळे नागरिकांचा मोठा प्रश्न सुटला असून मिर्जा यांच्या ‘व्हिजन’ची सर्वत्र चर्चा होत आहे.



