शहर

महागावमध्ये दारूबंदीची चळवळ जोरात; वार्ड क्रमांक 1 मध्ये महिलांच्या सयाचे व्हेरिफिकेशन


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्रमांक 1 मध्ये नव्याने सुरू झालेल्या देशी दारूच्या दुकानाविरोधात महिलांनी उचललेला आवाज आता अधिक तीव्र झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल तक्रारीच्या अनुषंगाने 7 मार्च 2026 रोजी कन्या शाळा, महागाव येथे महिलांच्या सयाचे व्हेरिफिकेशन करण्यात आले.
या प्रक्रियेसाठी दारूबंदी विभागाचे निरीक्षक वाघ साहेब आपल्या संपूर्ण पथकासह महागाव येथे दाखल झाले होते. सकाळपासून सायंकाळी सुमारे सहा वाजेपर्यंत वार्ड क्रमांक 1 मधील देशी दारू दुकान “आडवी बाटली” संदर्भात महिलांची उपस्थिती नोंदवून सयाचे पडताळणी करण्यात आली.
या वेळी सुमारे 92 टक्के महिलांनी उपस्थित राहून सही नोंदवली, त्यामुळे दारूबंदीच्या मागणीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या प्रक्रियेचा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
दरम्यान, महागावमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पडून देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते. आता वार्ड क्रमांक 1 मध्येही तीच प्रक्रिया सुरू झाली आहे.
तसेच लवकरच वार्ड क्रमांक 17 मध्येही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी महिलांच्या सयाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण महागाव शहर दारूमुक्त करण्यासाठी महिलांनी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे.
या चळवळीला काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री नरवाडे यांनी पुढाकार घेत दारूबंदीचा एल्गार पुकारला असून, पुढील प्रशासकीय हालचालीकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button