हिमायतनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा ६ चिमुकल्यांना चावा शहरात भितीचे वातावरण !

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी):
शेख खय्युम कुरेशी शांत असलेल्या हिमायतनगर शहरात आज रक्ताचा सडा पडला आणि सर्वत्र किंकाळ्या घुमल्या. शहरामध्ये एका रक्ताळलेल्या जबड्याच्या पिसाळलेल्या श्वापदाने अक्षरशः तांडव घातले. खेळणाऱ्या ६ निष्पाप चिमुकल्यांवर या सैतानाने असा हल्ला चढवला की, पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
पाशवी हल्ला आणि रक्ताचा सडा सकाळची वेळ असताना अचानक या पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांवर झडप घातली. तो इतका हिंसक होता की त्याने मुलांच्या शरीराचे लचके तोडून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला असून, जमिनीवर सांडलेले रक्त या घटनेच्या भीषणतेची साक्ष देत होते. नागरिकांनी काठ्या घेऊन धाव घेतली, मात्र तोपर्यंत या ‘यमदूताने’ ६ जणांना गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाचा वणवा पेटला आहे. व “नगरपंचायतीकडे यावर पूर्णविराम लावून योग्य ती विल्हेवाट लावण्याची मागणी शहरातील पालकांकडून होत आहे” या ‘पिसाळलेल्या दहशती’चा तातडीने खात्मा करण्याची मागणी होत आहे.



